घरदेश-विदेश'काश्मीर प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने जर लक्ष दिले नाहीतर आण्विक युद्ध होऊ शकते'

‘काश्मीर प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने जर लक्ष दिले नाहीतर आण्विक युद्ध होऊ शकते’

Subscribe

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम लागू करावं. तसंच काश्मीरमधील संचारबंदी उठवावी आणि सैन्य देखील मागे घ्यावे, अशी मागणी इम्रान खान यांनी केली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ मधील लेखामध्ये भारताला इशारा दिला आहे. काश्मीर प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने जर लक्ष दिले नाहीतर आण्विक युद्ध होऊ शकते, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली आहे. जम्मू-काश्मीर मधील ३७० कलम हटविण्याचा निर्णय मागे घेतला तर भारताशी चर्चा करणं शक्य आहे, असं देखील इम्रान खान यांनी म्हटलं आहे. एका बाजूला पाकिस्तानचे पंतप्रधान भारतला धमकी देत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हे भारतासोबत द्विपक्षीय चर्चा करण्याबाबत तयारी दर्शवत आहेत. त्यामुळे इम्रान खान यांच्या मंत्रीमंडळाचे मतभेद निदर्शनास दिसून येत आहे.

नक्की वाचाजम्मू-काश्मीरमध्ये ५० हजार रिक्त जागा भरणार; राज्यपालांची घोषणा

- Advertisement -

पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी भारतला अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ मधील एका लेखामधून भारताला इशारा दिला आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा काश्मीर चर्चा व्हायला हवी, असं म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू करण्यात यावं. भारताने काश्मीरमधून संचारबंदी उठवावी आणि सैन्य देखील मागे घ्यावं, अशी इम्रान खान यांनी मागणी केली आहे.

भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा ३७० कलम हद्दपार करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय घेतला. या निर्णयनंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तान भारताविरोधात अनेक निर्णय घेतले. तसेच भारताच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लघंन केले जात आहे. त्यामुळे पाकिस्तान किती अस्वस्थ  झाला आहे ते कळतं आहे.

- Advertisement -

हेही वाचा‘पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करू शकत नाही.’

आता पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी भारतासोबत द्विपक्षीय चर्चा करण्यात काहीच अडचण नसल्याचं म्हटलं आहे. तसंच या चर्चेसाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण भारत या चर्चेला तयार आहे की नाही? यावरच सर्व काही अवलंबून असल्याचं कुरेशी यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -