Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश '2028 मध्ये विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतील, तेव्हा देश...'; अर्थव्यवस्थेवर बोलताना मोदींनी काँग्रेसवर...

‘2028 मध्ये विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतील, तेव्हा देश…’; अर्थव्यवस्थेवर बोलताना मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा

Subscribe
Modi In Parliament : मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) प्रकरणी विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर आज (10 ऑगस्ट) आज तिसऱ्या दिवशीही लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर (COngress) निशाणा साधला. ते म्हणाले की, 1990 मध्ये देशात गरिबीची स्थिती होती. मात्र आमच्या काळात अर्थव्यवस्थेने टॉप फाइव्हमध्ये स्थान मिळवले आहे. (In 2028 the opposition will bring a motion of no confidence when the country Talking about the economy Modi targeted the Congress)
लोकसभेत बोलताना मोदी म्हणाले की, 1990 मध्ये देशात गरिबीची स्थिती होती. काँग्रेसच्या शेवटच्या टर्ममध्ये अर्थव्यवस्था 10, 11, 12 व्या क्रमांकावर कायम राहिली. पण आता अर्थव्यवस्थेने टॉप फाइव्हमध्ये स्थान मिळवले आहे. जादूच्या कांडीने हे सर्व घडले, असे काँग्रेसच्या लोकांना वाटले, असा टोला लगावतानाच मोदी म्हणाले की, कठोर परिश्रम, निश्चित नियोजन आणि सुधारणा या परिश्रमाच्या पराकाष्ठेतून हे शक्य झाले आहे.

विरोधकांकडून 2028 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणला जाईल

विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले की, 2028 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणला जाईल, तेव्हा देश तिसऱ्या क्रमांकावर असेल, हा आमचा विश्वास आहे. आपल्या विरोधी मित्रांच्या स्वभावातच अविश्वास दडलेला आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. आम्ही लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारत अभियानाची हाक दिली, तेव्हा गांधीही असे सांगून गेले होते, असे विरोधक म्हणाले. आम्ही आई-मुलीला उघड्यावर शौचास जाण्याच्या सक्तीतून मुक्त करण्यासाठी शौचालयाचा आग्रह धरला, तेव्हा लाल किल्ल्यावरून असे विषय बोलले जातात का? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला. जनधन खात्याच्या वेळीही असेच म्हटले गेले. आम्ही योग, आयुर्वेद याविषयी बोललो, तेव्हा विरोधकांनी पुन्हा खिल्ली उडवली.

विरोधकांचे पाकिस्तानवर प्रेम होते

काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या मित्रांचा असा इतिहास आहे की, त्यांचा भारतावर आणि भारताच्या क्षमतेवर कधीच विश्वास नव्हता. त्यांनी कोणावर विश्वास ठेवला? त्यांचे पाकिस्तानवर इतके प्रेम होते की, ते त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचे. हल्ले आणि चर्चा एकत्र होतील, असे पाकिस्तान म्हणायचे आणि ते या गोष्टी स्वीकारायचे, असेही मोदी म्हणाले.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -