घरदेश-विदेशcyber crime:ऑनलाईन फ्रॉड झाल्यास 24 तासात मिळतील संपूर्ण पैसे, वाचा सविस्तर

cyber crime:ऑनलाईन फ्रॉड झाल्यास 24 तासात मिळतील संपूर्ण पैसे, वाचा सविस्तर

Subscribe

जगभरामध्ये इंटरनेटच्या वापरामुळे प्रत्येक व्यवहार डिजीटल(digital) झाले आहेत. मात्र डिजीटलकरणाचा फायदा घेऊन अनेक सायबर फ्रॉड (cyber crime)करणाऱ्या गुन्हेगांरामध्ये (hacker)देखील प्रचंड वाढ झाली आहे. विविध मार्गांनी लोकांची ऑनलाईन फसवणूक(online fraud) करुन त्यांच्या बँकेतील(bank) रक्कम लंपास करण्यात येते. मात्र लोकांची वाढती फसवणूक पाहता भारत सरकारने याला आळा घालण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. या हेल्पलाईंन अंतर्गत ऑनलाईन फ्रॉर्ड झाल्यास चक्क 24 तासांच्या आत संपूर्ण रक्कम संबधीत व्यक्तीच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. तर नेमकी काय आहे ही सिस्टम तसेच याचा फायदा कसा घेऊ शकता हे जाणून घेऊया

गृह मंत्रालयाने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (National Cyber Crime Reporting Portal) तयार केलं आहे. https://cybercrime.gov.in/Default.aspx या वेबसाईटवर एक हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. 155260 या नंबरवर ऑनलाईन फ्रॉड झाल्यास तुम्ही कॉल करु शकतात. यासाठी निश्चित वेळ देण्यात आली असून दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, तमिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेशमध्ये 24 तास या नंबरवर कॉल करुन तक्रार दाखल करता येते. तर इतर राज्यात सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत फोनद्वारे तक्रार करता येते.

- Advertisement -

तक्रार दाखल करताना ऑनलाईन फ्रॉड झाल्याची संपूर्ण माहिती देणं आवश्यक आहे. म्हणजेच ऑनलाईन फ्रॉड कधी झाला त्याची योग्य वेळ.जागा. यासोबतच तुमच्या बँकेची सर्व डिटेल्स नाव,पत्ता, किंवा ज्या ई-वॉलेटमधून रक्कम ट्रांन्सफर झाली आहे याची सर्व माहिती. या सर्वाचा पाठपूरावा करत पुढील तपास करण्यात येईल तसेच तुमचे पैसे मिळण्यास मदत होईल.

155260 या नंबरवरुन जेव्हा तुम्ही सायबर क्राईमला कॉल करणार तेव्हा तुमच्या सोबत झालेल्या फ्रॉडची सर्व माहिती रोकॉर्ड करण्यात येते. आणि यानूसार सायबर क्राईम सेलतर्फे ज्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले आहे ते अकाऊंट ताबडतोब फ्रीज केलं जात म्हणजेच ज्या व्यक्तीने फ्रॉड केलं आहे तो त्याच्या अकांऊटमधून पैसै काढू शकत नाही. सायबर सेल द्वारे चौकशी करुन अकाऊंट फ्रॉडद्वारे काढण्यात आलेली रक्कम पुन्हा तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येते

- Advertisement -
महत्वाची माहिती-

ऑनलाईन फ्रॉड झाले आहे कळताच हेल्पलाईनवर कॉल करा.

अनोळखी व्यक्तीसोबत ओटीपी नंबर शेअर करु नका.

कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका.

बँकेची डिटेल्स किंवा इतर माहिती चुकूनही कोणाला सांगू नका.

 


हे हि वाचा – बाबो! १० वीच्या शाळकरी मुलीने FaceBook फ्रेंडला गिफ्ट दिले ७५ तोळे सोने!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -