घरदेश-विदेश३० वर्षांत गुजरातमध्ये एकही मुस्लीम खासदार नाही

३० वर्षांत गुजरातमध्ये एकही मुस्लीम खासदार नाही

Subscribe

गेल्या 30 वर्षांपासून गुजरातमधून एकही मुस्लीम खासदार निवडून आलेला नाही. जवळपास 10 टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या गुजरातमध्ये यंदाही याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार असलेले अहमद पटेल 1984 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. मात्र, 1989 मध्ये भाजपच्या चंदू देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे 1989 पासून गुजरातमधून एकही मुस्लीम खासदार निवडून आलेला नाही.

गुजरातमध्ये सध्या 9.5 टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीचा इतिहास लक्षात घेतल्यास, 1962 मध्ये बनासकांठामधून जोहरा चावडा निवडून आल्या होत्या. त्यानंतर 1977 मध्ये दोन मुस्लीम उमेदवार निवडून आले. अहमद पटेल (भरुच) आणि एहसान जाफरी (अहमदाबाद) निवडून आले होते. एकाच निवडणुकीत दोन मुस्लीम खासदार निवडून देण्याची गुजरातची ही पहिली आणि शेवटची वेळ होती.

- Advertisement -

गुजरातमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचे बळ मोठे आहे. या राज्यात भाजपने कधीही मुस्लीम उमेदवार दिला नाही. काँग्रेसने 2014 पर्यंत राज्यात 15 मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवले. यावेळी काँग्रेसने फक्त भरुचमधून मुस्लीम उमेदवार दिला आहे. भरुच मतदारसंघात मुस्लिमांचे प्राबल्य आहे. या मतदारसंघात 15.64 लाख मतदार आहेत. यातील 22 टक्केे मतदार मुस्लीम आहेत, तर अहमदाबाद पश्चिममध्ये 25 टक्के मुस्लीम मतदार आहेत. गांधीनगरमधील जुहापुरामध्येदेखील मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. यंदा गांधीनगरमधून भाजपचे अध्यक्ष अमित शहा निवडणूक लढवत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -