घरताज्या घडामोडीइतिहासात पहिल्यांदाच न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार!

इतिहासात पहिल्यांदाच न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार!

Subscribe

१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पहिल्यांदा तिरंगा फडकणार आहे. न्यूयॉर्कमधील लोकप्रिय टाईम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकावणार असल्याची घोषणा अमेरिकेतील एका ग्रुपने केली आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी पहिल्यांदाच न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकवून इतिहास रचण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने न्यूयॉर्कमधील या कार्यक्रमासाठी भारताचे महावाणिज्य दूत रणधीर जायसवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच तेच ध्वजारोहण देखील करणार आहेत, अशी माहिती तीन राज्य न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कनेक्टिकट येथील फेडरेसन ऑफ इंडियन असोसिएशन (एफआयए)ने दिली आहे.

वास्तविक, पर्यटकांमध्ये टाईम्स स्क्वेअर हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. जगातील सर्वात मोठे आणि आकर्षक बिलबोर्ड पैकी न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर एक आहे. न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठेच्या ठिकाणी पहिल्यांदाच तिरंगा फडकणार आहे. यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमीपूजनच्या कार्यक्रमादिवशी न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरील आकर्षक बिलबोर्डवर प्रभू राम आणि भव्य राम मंदिराचा थ्री डी फोटो झळकला होता. या व्यतिरिक्त १७ हजार चौरस फूट एलईडी स्क्रिनवर थ्रीडी फोटो प्रदर्शित केले होते.

- Advertisement -

दरम्यान सध्या कोरोनामुळे अमेरिकेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. जगात सर्वाधिक कोरोनाचा कहर अमेरिकेत आहे. वर्ल्डोमीटर दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या ५२ लाख ५० हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६६ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून २७ लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Corona Live Update: देशात काल दिवसभरात झाल्या ६ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -