घरदेश-विदेशआंध्र प्रदेशमध्ये कोरोना झटपट बरा करणार्‍या औषधासाठी लोकांची उडाली झुंबड!

आंध्र प्रदेशमध्ये कोरोना झटपट बरा करणार्‍या औषधासाठी लोकांची उडाली झुंबड!

Subscribe

युर्वेदिक औषधासाठी लोकांनी एकच गर्दी केलेली दिसत आहे. कोरोनावर मात करणार्‍या या औषधासाठी नागरिक दुसर्‍या राज्यातून देखील येत असल्याचे कळतेय. बी आनंदय्या नावाच्या वैद्याने तयार केलेलं आयुर्वेदिक औषध कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

जगभरामध्ये कोरोना व्हायरसने हाहकार माजवला आहे. कोरोनाबधितांचा आकडा दिवसागणिक लाखोंच्या घरात पोहोचला आहे. एकीकडे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासन-प्रशासनाने कंबर कसली आहे. तर दुरीकडे आरोग्य व्यवस्थेवर याचा ताण वाढतच चालला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातून अनेक शास्त्रज्ञ संशोधनाचे प्रयत्न करत आहेत . मात्र दुसरीकदे याच्या विपरीत स्थिति दिसत आहे आंध्र प्रदेशच्या एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपटणम येथे कोरोना व्हायरसवरील उपचाराकरिता आयुर्वेदिक औषधासाठी लोकांनी एकच गर्दी केलेली दिसत आहे. कोरोनावर मात करणार्‍या या औषधासाठी नागरिक दुसर्‍या राज्यातून देखील येत असल्याचे कळतेय. बी आनंदय्या नावाच्या वैद्याने तयार केलेलं आयुर्वेदिक औषध कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -

 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी या घटणेसंदर्भात एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेत कृष्णपट्टणममधील औषधाबाबत माहिती घेतली. तसेच या बैठकीत हे औषध प्रभावी आहे का ? हे जाणून घेण्यासाठी आयसीएमआर आणि तर तज्ज्ञांमार्फत या औषधावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे, असं उपमुख्यमंत्री ए के के श्रीनिवास यांनी आढावा बैठकीनंतर सांगितलं. तसेच संबंधित औषध हेकोव्हिड 19 वर प्रभावी आहे कि नाही औषध बनवण्याची कृतीच्या संशोधनासाठी आंध्र प्रदेश सरकारने तज्ज्ञांचं पथक तसंच आयसीएमआरची एक टीम नेल्लोरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही केंद्रीय आयुष मंत्री आणि आयसीएमआरला या औषधावर संशोषन करायला सांगितल्याचं कळतं. कृष्णपट्टणम कोरोना औषध असं या आयुर्वेदिक औषधाचं नाव आहे. आनंदय्या आयुर्वेदिक औषध लोकांना मोफत देत आहेत. कोरोंनाबधित रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास त्यांना आयड्राप देखील दिला जातो. या औषधाचे दोन थेंब डोळ्यात टाकल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ऑक्सिजन पातळी वाढते, असा दावा केला जात आहे. आत्तापर्यंत ज्या लोकांनी या आयुर्वेदिक औषधाचे सेवन केले आहे त्यांना कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाहीत. असं स्थानिक आमदार के गोवर्धन रेड्डी यांनी सांगितलं. तर दुसरीकडे जिल्हा पंचायत अधिकारी धनलक्ष्मी याच्या नेतृत्त्वाखाली नेल्लोरचे जिल्हाधिकारी के व्ही एन चक्रधर बाबू यांनी एका समितीची नेमणूक केली असून त्यात आयुष डॉक्टर आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय ज्या रुग्णांनी या औषधाचं सेवन केलं, त्यांच्यात दुष्परिणाम दिसले नाहीत, असंही म्हटलं. औषधाचे नमुने तपासणीसाठी हैदराबादमधील आयुष प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


हे हि वाचा – Corona Crisis: कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट,WHOची धक्कादायक माहिती

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -