घरदेश-विदेशबंगळुरूमध्ये शाळेच्या मुलांना पूल पार करण्यासाठी घ्यावा लागतोय JCBचा आधार, व्हिडीओ व्हायरल

बंगळुरूमध्ये शाळेच्या मुलांना पूल पार करण्यासाठी घ्यावा लागतोय JCBचा आधार, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बेंगलुरु – कर्नाटकमध्ये काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राजधानी बेंगलुरूसह अनेक जिल्ह्यात महापूर आला आहे. राज्यातील नदी- नाल्यांना पूर आला असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या दरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत विद्यार्थी जेसीबीवर बसून नदीवरील पूल पार करत असल्याचे दिसत आहे.

व्हिडिओत काय –

- Advertisement -

व्हायरल व्हिडिओ 32 सेकंदाचा आहे. या व्हिडिओत एक डझनहून अधिक विद्यार्थी जेसीबीच्या पुढच्या बाजूला असणाऱ्या लोडर आणि चालकाच्या सीटच्या बाजुला बसून पूल पारकरत आहेत. पुलाची लांबी पाहून अंदाज व्यक्त केला जात आहे की हा पुल एखाद्या नदीवर बनवण्यात आला असावा. पुलाच्या दोन्ही बाजूला लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. महापुरानंतरचे हे दृष्य कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्याच्या गुलेदागुड्डा शहरातील आहे. अतिवृष्टीमुळे नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या बाजुला नेण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागत आहे.

- Advertisement -

 ट्रॅक्टरचाही उपयोग –

 

पाऊस व शहरातील रस्ते जलमय झाल्याने अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शाळांनी ऑनलाइन क्लासची व्यवस्था केली आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. आउटर रिंग रोड आणि सरजापूर रोड परिसरात सर्वाधिक आयटी कंपन्यांचे कार्यालय आहे. या परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. लोकांना  ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागत आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -