घरताज्या घडामोडीकारने दिलेल्या धडकेत 70 वर्षीय वृद्ध सायकलस्वाराचा मृत्यू; 8 किमी नेले फरफटत

कारने दिलेल्या धडकेत 70 वर्षीय वृद्ध सायकलस्वाराचा मृत्यू; 8 किमी नेले फरफटत

Subscribe

एका कार चालकाने 70 वर्षीय वृद्ध सायकल चालकाला धडक दिली. आठ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेत वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कदायक घटना बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील कोतवा पोलीस स्टेशन परिसरातील NH 27 वर घडली.

एका कार चालकाने 70 वर्षीय वृद्ध सायकल चालकाला धडक दिली. आठ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेत वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कदायक घटना बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील कोतवा पोलीस स्टेशन परिसरातील NH 27 वर घडली. शंकर चौधरी असे या अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेनंतर कार चालक व गाडीतील सर्वजण पळून गेले. मात्र, पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून, आरोपींचा तपास करत आहेत. (in bihar 70 year old man dragged on car bonnet for 8km crushed to death)

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील कोतवा पोलीस स्टेशन परिसरात NH 27 वर एका अपघातात झाला. सायकलस्वार शंकर चौधरी हे बांगरा चौकाजवळ NH 27 ओलांडत होते. त्याचवेळी गोपालगंजकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने शंकर चौधरी यांच्या सायकलला धडक दिली. धडकल्यानंतर शंकर चौधरी हे कारच्या बोनेटवर पडले त्यानंतर वायपरला पकडले. याच दरम्यान ते आरडाओरडा करत गाडी थांबवण्याची विनंती करत होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांनी ते पाहिले. गाडी थांबवण्यासाठी त्यांनी जोरजोरात आरडाओरडाही केला. तर काही लोकांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. मात्र कार चालक त्याच वेगाने कार चालवत होता. पाठीमागून येणारे लोक पाहून कोतवा येथील कदम चौकाजवळ चालकाने अचानक ब्रेक दाबला आणि शंकर पुढे पडले. याच दरम्यान त्यांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

या अपघातात शंकर चौधरी याचा मृत्यू झाला असून, शंकर चौधरी हे कोतवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांगरा गावचे रहिवासी आहेत. दरम्यान, कोतवा पोलीस ठाण्याचे प्रमुख अनुज कुमार यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. परंतु कार चालक व गाडीतील सर्वजण पळून गेले.


हेही वाचा – धक्कादायक! अमेरिकेतील सीएनएनपासून ते वॉशिंग्टन पोस्टपर्यंतच्या सर्व मीडियात कर्मचारी कपात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -