घरदेश-विदेशदिवाळीत फटाके फोडण्याची हौस येऊ शकते अंगलट; सर्वोच्च न्यायालयाने दिले 'हे' निर्देश

दिवाळीत फटाके फोडण्याची हौस येऊ शकते अंगलट; सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ निर्देश

Subscribe

दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणाला सर्वत्र रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी केली जाते.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तर पूर्वीचे आदेश केवळ दिल्लीपुरते मर्यादित नव्हते, असे न्यायालयाने म्हटले आहे. फटाक्यांवर बंदी घालण्याचा आमचा आदेश संपूर्ण देशासाठी होता. फटाक्यांवर पूर्ण बंदीचा निर्णय त्या-त्या राज्य सरकारांवर सोडला होता असेसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी (7 नोव्हेंबर) रोजी झालेल्या सुनावणीत म्हटले आहे. (In Diwali you may feel like bursting firecrackers The Supreme Court gave this direction)

दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणाला सर्वत्र रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. मात्र, हेच फटाके प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात. यामुळेच सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणावर रोख लावण्याची जबाबदारी ही त्या-त्या राज्य सरकारची असून, त्यादृष्टीने महत्त्वाची पावलं उचलावे असेसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही नियम आखून दिले असून, केवळ दिल्लीपूरतेच हे नियम नसून, तर देशातील सर्व राज्यात लागू करावेत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : खासदारांचे निलंबन : काँग्रेसपेक्षा भाजप काळात कारवाईचा बडगा अधिक; 2014-23 मध्ये 141 वेळा निलंबनाची कारवाई

प्रदूषणाचा स्तर लक्षात घेऊन निर्णय घ्यावा

सर्वोच्च न्यायालयाने दाखल याचिकेवर सुनावणीत म्हटले आहे की, फटाके फोडण्याच्या निर्बंधावर त्या- त्या राज्यातील प्रदुषणाचा स्तर पाहून फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात यावी हा निर्णय त्या- त्या राज्याने घ्यावा असे असे सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले आहे. एकूणच ज्या राज्यात दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी आहे, त्या राज्यात फटाके फोडल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियाशी करणाऱ्या उदयनिधींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; काय म्हणाले?

मुंबईत आतिषबाजीला तीन तासांची परवानगी

राजधानी दिल्लीसह मुंबई शहरातील वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या वायू प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून याप्रकरणी मुंबई महापालिका आणि सरकारला धारेवर धरले होते. तर सोमवारी झालेल्या सुनावणीत महापालिकेला हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी चार दिवसांची अंतिम मुदत दिली होती. या मुदतीत वायू प्रदूषण कमी न झाल्यास बांधकामे बंद करण्याचा इशारासुद्धा दिला होता. दरम्यान आज महापालिकेकडून मुंबईत केवळ तीन तासांसाठी फटाके फोडण्याची मुभा देण्यात आली असून, त्याची वेळ संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -