Coronavirus India : ‘या’ राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक, ८४ टक्के नव्या रूग्णांची नोंद

देशातील आठ राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत असून दररोज ८४% नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या स्थानी आहे.

In eight states including Maharashtra 84% new covid 19 patients are registered daily
Coronavirus India : 'या' राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक, ८४ टक्के नव्या रूग्णांची नोंद

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा खाली गेलेला आलेख पुन्हा एकदा वरच्या दिशेने जाताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ६८,०२० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २९१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होताना दिसत आहे. यामध्ये आठ राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत असून दररोज ८४% नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी कर्नाटक आणि त्यापाठोपाठ पंजाबचा नंबर लागतो.

ही राज्य कोरोनाच्या विळख्यात

देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. या राज्यांमध्ये दररोज ८४.५ टक्के नव्या रुग्णांची नोंद होत आहे. तर महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि छत्तीसगड याठिकाणी एकूण Active केसेस ८० टक्के आहेत.

देशाच आता पुन्हा एकदा कोरोनाची लाट आल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत ६८ हजार २० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २९१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यातील ३२ हजार २३१ नागरिक बरे होऊन घरी परतले आहेत.

लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानावर!

संपूर्ण देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला मोठ्या पातळीवर सुरुवात झाली. सध्या कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस देण्यात येत आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस घेण्यासाठी केंद्राकडून परवानगी देण्यात आली. या कोरोना लसीकरणाच्या मोहीमेत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ५० लाखांहून अधिक जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे.


हेही वाचा – बांग्लादेश मुक्ती लढ्यात पंतप्रधानांना कधी अटक झाली? जयंत पाटलांचा सवाल