Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Video: प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळून ध्वजस्तंभाचे नुकसान, मंदिराच्या भिंती पडला काळ्या

Video: प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळून ध्वजस्तंभाचे नुकसान, मंदिराच्या भिंती पडला काळ्या

द्वारकाधीश मंदिरावर असलेल्या ५२ फुट उंच ध्वजस्तंभावर वीज कोसळली.

Related Story

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी उत्तर भारतात वीज कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल ६८ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना आता गुजरातच्या प्रसिद्ध अशा द्वारकाधीश मंदिरावर देखील वीज कोसळली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. द्वारकाधीश मंदिरावर असलेल्या ५२ फुट उंच ध्वजस्तंभावर वीज कोसळली. मंगळवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारात ही घटना घडली. वीज पडल्याने द्वारकाधीश मंदिराच्या ध्वजस्तंभाचे मोठे नुकसान झाले आहे. तर मंदिराच्या भिंती काळ्या पडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी न झाल्याने दिलासा मिळाला आहे. ( gujrat famous Dwarkadhish temple was damaged by lightning flagpole was damage, walls of the temple fell black)

द्वारकाधीश मंदिरावर वीज पडल्याच्या घटनेनंतर द्वारकेचे उपजिल्हाधिकारी निहार भेटारिया यांनी मंदिर परिसराला भेट देऊन घटनेची संपूर्ण पाहणी केली. पाहणीनंतर मंदिरातील कामकाज धीम्या गतीने सुरु करण्यात आले आहे.

- Advertisement -

२२००वर्ष जुने मंदिर

गुजरातच्या द्वारका येथे गोमती नदीच्या तिरावर २२०० वर्ष जुने द्वारकाधीशाचे मंदिर आहे. जन्माष्टमीच्या दिवशी द्वारकेतील या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. भगवान श्री कृष्ण यांच्यासोबत सौभद्रा, बलराम, रेवती,रुक्मिणी या देवतांच्या मुर्ती मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात स्थापन करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

देशातील अनेक राज्यात गेल्या २-३ दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. राज्यस्थानच्या अमेर फोर्टवर फिरण्यासाठी गेलेल्या तरुण तरुणीचा सेल्फी घेताना वीज कोसळून मृत्यू झाला. तर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज कोसळून ६८हून अधिक जणांचा जीव गेला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याविषयी दु:ख व्यक्त केले. त्याचप्रमाणे मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत देखील जाहीर केली.


हेही वाचा – उत्तर भारतात वीज कोसळल्याने ६८ जणांचा मृत्यू

 

- Advertisement -