घरदेश-विदेशमहिलांच्या मतदारसंघाचा आर्थिक विकास अधिक

महिलांच्या मतदारसंघाचा आर्थिक विकास अधिक

Subscribe

मतदारसंघाच्या आर्थिक विकासात पुरुषांपेक्षा महिला आमदार सरस

भारताच्या विविध राज्यातील विधानसभा मतदारसंघात ज्याठिकाणी महिला आमदार प्रतिनिधित्व करतात त्या मतदारसंघाचा आर्थिक विकास हा इतर मतदारसंघापेक्षा अधिक होत असल्याचे एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी वर्ल्ड इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब सिद्ध झाली आहे.

पुरुष प्रतिनिधींपेक्षा १.८ टक्के महिला प्रतिनिधी आपल्या मतदारसंघामध्ये आर्थिक विकास घडवून आणतात असे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. १९९२ ते २०१२ या कालावधीतील देशभरातल्या ४,२६५ विधानसभा मतदारसंघाची माहिती मिळवून हा अभ्यास करण्यात आला.

- Advertisement -

सर्वेक्षणाचे मुख्य निष्कर्ष

– आर्थिक प्रगती

युएन विद्यापीठाच्या अंदाजानुसार, भारतातील महिला आमदार या पुरुष आमदारांपेक्षा दरवर्षी सुमारे १५ टक्के अधिक आर्थिक प्रगती करतात. वार्षिक जीडीपीमध्ये साधारण यामुळे १.८ टक्के प्रगती होते. भारतातील साधारण प्रगती ही ७ टक्क्यांपर्यंत होती, मात्र महिला आमदार असलेल्या मतदारसंघातील ही प्रगती २५ टक्के असल्याचे सांगितलं आहे.

– पायाभूत सोयीसुविधा

रस्ते प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये महिला आघाडीवर असून या कामातदेखील त्यांची प्रगती जास्त चांगली आहे. कार्यक्षमता, गुणवत्ता, कमी भ्रष्टाचार या सर्व कारणांमुळे लोकांच्या हितासंबंधी कामं महिला लवकर पूर्ण करू शकतात असंही यातून सिद्ध झालं आहे.

- Advertisement -
– गुन्हेगारी पार्श्वभूमी

पुरुष आमदारांच्या तुलनेमध्ये महिला आमदारांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी असते. तसंच सरासरी त्या पुरुषांपेक्षा तुलनेने लहान असतात. शिक्षण आणि संपत्ती या श्रेणीमध्ये पुरुष वा महिलांमध्ये कोणताही लक्षणीय फरक जाणवत नाही. फौजदारी स्वरुपामध्ये पुरुषांपेक्षा महिलांवर कमी आरोप असतात. एकूण महिला आमदरांपैकी १० टक्के महिलांवरच गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात आलं आहे.

– कार्यालयातील भ्रष्टाचार

या सर्वेक्षणातून असंही निर्दशनास आले की, पुरुषांच्या तुलनेत महिला आमदार वैयक्तिक वा आर्थिक फायद्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर कमी प्रमाणात करतात. आर्थिक विकास न होण्यासाठी भ्रष्टाचार हे एक मोठे कारण आहे.

– स्वच्छ प्रशासन

महिलांचा मतदारसंघ अधिक विकास अनुभवत असल्याचे महत्त्वाचे कारण आहे स्वच्छ प्रशासन. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी महिला आमदारांचे प्रमाण वाढले पाहिजे असंच यातून स्पष्ट होत आहे. थोडक्यात सांगायचे तर आपले प्रश्न हे सगळ्यांचेच आहेत, हे गृहीत धरून महिला आमदार काम करतात. त्यामुळे त्यांनी मोठ्या संख्यने राजकारणात येणं गरजेचं आहे, हीच जाणीव या अभ्यासातूनदेखील सिद्ध होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -