घरदेश-विदेशभारतात रुग्णांना पुरेसा ऑक्सिजनचा नाही, युनिसेफकडून मदतीचं आवाहन

भारतात रुग्णांना पुरेसा ऑक्सिजनचा नाही, युनिसेफकडून मदतीचं आवाहन

Subscribe

भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबर तडाखा बसला आहे. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणावत आहे. या पार्श्वभूमीवर युनिसेफने सर्वांना भारताच्या मदतीसाठी आवाहन केलं आहे. कोरोनाची प्राणघातक लाट संपूर्ण भारतात पसरली आहे. रुग्णांसाठी पुरेसा ऑक्सिजन नाही, रुग्णालये भरली आहेत आणि चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे युनिसेफला देणगी देऊन जीवनरक्षक पुरवठा करण्यात मदत करा, असं आवाहन केलं आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर्स, चाचण्या किट्स आणि आपात्कालीन उपकरणांची मदत युनिसेफने केली आहे. परंतु जीव वाचविण्यासाठी तातडीने अधिक मदतीची आवश्यकता आहे. यापुढे लोकांचे जीव वाचवाण्यासाठी तातडीने कृती करण्याची आवश्यकता आहे, असं युनिसेफने म्हटलं आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा गंभीर परिणाम लहान मुलांवर होत आहे. त्यामुळे आपण एकत्र काम केलं नाही तर तोपर्यंत आपल्याला धोका कायम असेल. आपल्याला कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा लागेल, असं युनिसेफने म्हटलं आहे.

- Advertisement -

युनिसेफ त्यांच्या पार्टनरसोबत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांट बसवत आहे. बाधित जिल्ह्यांमध्ये अचूक आणि जलद चाचणी करण्यासाठी किट्स देत आहे. तसंच या लाटेला थोपवण्यासाठी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना सहकार्य करा, त्यांच्या कामात व्यत्यय आणू नका, असं आवाहन युनिसेफने केलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -