घरCORONA UPDATELockdown :कुठे पगार कपात तर कुठे आर्थिक टंचाई, मात्र 'ही' कंपनी झाली...

Lockdown :कुठे पगार कपात तर कुठे आर्थिक टंचाई, मात्र ‘ही’ कंपनी झाली मालामाल!

Subscribe

या कंपनीची तीन महिन्यातील कमाई दुप्पट ३२.८ कोटी डॉलर्स झाली आहे.

सध्या देशात कोरोनामुळे सगळेच हैराण झाले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. तर काही कंपन्यांमध्ये पगार कपात यांसारखे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे संपर्ण देशालाच आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे. मात्र या सगळ्यातही एक अशी कंपनी आहे जी मालामाल झाली आहे. ज्या कंपनीसाठी कोरोना हे वरदान ठरलं आहे. लॉकडाऊनमुळे बहुतेक कंपन्या आर्थिक नुकसानीतून जात असताना या काळात कंपनीचे उत्पन्न दुप्पट झाले आहे.

ही कंपनी म्हणजे सध्या सगळ्यात जास्त ज्या अपचा वापर सगळे करतायत ते झूम अँप. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सर्व कंपन्यांमधून वर्क फ्रॉर्म होमची सुरूवात झाली. पण यावेळी घरुन काम करताना व्हिडीओ संवाद खूप महत्वाचा ठरतो. ऑनलाइन मिटींग, कॉल, शिक्षण, मित्र आणि नातेवाईकांशी बोलण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉलचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. त्याचप्रमाणे अनेक शाळांमध्ये देखील ऑनलाईन क्लासेसला सुरूवात झाली आहे. या क्षेत्रात काम करणार्‍या कंपनीचा व्यवसाय या काळात जोरदार वाढला आहे. गेल्या बर्‍याच दिवसांमध्ये, लोकांनी झूम अ‍ॅप वापरला आहे. त्यामुळेच या कोरोनाच्या काळात कंपनीची कमाई दुप्पट झाली आहे. कोरोनामुळे या कंपनीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली  आहे.

- Advertisement -

झूम कंपनीची गेल्या तीन महिन्यातील कमाई दुप्पट ३२.८ कोटी डॉलर्स झाली आहे. ज्यामुळे कंपनीचा नफा २.७ कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे. यापूर्वीच्या तीन महिन्यात कंपनीची कमाई १ लाख ९८ हजार डॉलर्स इतकी होती. कंपनीची कमाई दुप्पट झाल्यामुळे सहाजिकच वॉल स्ट्रीटवरील कंपनीच्या शेअरची किंमत तिप्पट झाली आहे.

व्हिडीओ संवाद या काळात खूप महत्त्वाचा झाला आहे. या व्यतिरिक्त, व्यवसायातील वाढीसह, कंपनी पुढील तीन महिन्यात ५० कोटी डॉलर्सची कमाई करेल. जो कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या कोणत्याही तिमाहीपेक्षा ४ पट जास्त असू शकतो.

- Advertisement -

– एरिक युआन, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी


हे ही वाचा – ‘लव्ह- सेक्स’ चॅट करत महिलेने २ तरूणांना ओढलं आपल्या जाळ्यात आणि…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -