Eco friendly bappa Competition
घर क्राइम मध्य प्रदेशात चोरीच्या संशयावरून तरुणाला विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल

मध्य प्रदेशात चोरीच्या संशयावरून तरुणाला विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

भोपाळ : मध्य प्रदेशात माणुसकीला काळीमा फासणारे एका पाठोपाठ एक व्हिडीओ समोर येत आहेत. आता सागर जिल्ह्यात चोरीच्या संशयावरून एका तरुणाला विवस्त्र करून काही लोकांनी लाठ्याकाठ्या आणि पाइपने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यातील कुबरी गावात मद्यधुंद अवस्थेतील एक व्यक्ती अन्य आदिवासी तरुणाच्या अंगावर लघुशंका करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी पोलिसांनी प्रवेश शुक्ला याच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच प्रवेश शुक्लाच्या घरावर बुलडोझरही फिरवण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता सागर जिल्ह्यात एका तरुणाला विवस्त्र करून काही लोकांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

व्हायरल झालेला व्हिडिओ आपण पाहिला असून ही घटना मोतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमकांटा परिसरात घडली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, असे पोलिस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी सांगितले. या घटनेप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आरोपींना अटक करून चौकशी केल्यानंतर हा व्हिडीओ तसेच त्याच्याशी संबंधित प्रकरणाचा तपशील समोर येईल, असे मोतीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी मानस द्विवेदी म्हणाले.

- Advertisement -

मारहाणीच्या अनेक घटना समोर
मारहाणीची आणखी एक घटना पोलिसांनी नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी उघडकीस आलेल्या आणखी एका घटनेत, 30 जून रोजी शिवपुरी जिल्ह्यातील वरखडी गावात काही मुलींची छेडछाड केल्याच्या संशयावरून दोन दलित पुरुषांना अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी मारहाण केली आणि त्यांचा व्हिडीओ बनवला.

हेही वाचा – भारतात घुसखोरांच्या संख्येत वाढ? सीमा हैदरच्या घटनेमुळे प्रश्न ऐरणीवर

शुक्रवारी आणखी एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये ग्वाल्हेरमध्ये एका व्यक्तीला चालत्या गाडीत मारहाण करण्यात आली आणि त्याचे पायाचे तळवे चाटण्यास भाग पाडले गेले. या घटनेप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, इंदूर जिल्ह्यात शनिवारी एका अल्पवयीन मुलासह दोन आदिवासी भावांना ओलीस ठेवून मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता.

- Advertisment -