घरदेश-विदेशमध्य प्रदेशात व्यसनी पोपटांचा सुळसुळाट, अफूच्या पिकांवर मारतात चोच; शेतकरी संकटात

मध्य प्रदेशात व्यसनी पोपटांचा सुळसुळाट, अफूच्या पिकांवर मारतात चोच; शेतकरी संकटात

Subscribe

मंदसौर – मध्य प्रदेशच्या अनेक गावांमध्ये कायदेशीर अफूची शेती केली जाते. यासाठी केंद्रीय नारकोटिक्स विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना अफूची शेती करण्यासाठी परवाना दिला जातो. नारकोटिक्स विभागाच्या नियंत्रणाखाली शेतकरी येथे अफू उगवू शकतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची अफूची शेती धोक्यात आली आहे. कारण, येथील पोपट आता अफू खायला लागले आहेत.

मध्य प्रदेशच्या मंदसौर, नीमच आणि रतलाम गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अफूची शेती केली जाते. परंतु, येथे व्यसनी पोपटांची दहशत निर्माण झाली आहे. अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन सरकारला विकावं लागतं. जर शेतकऱ्याने सरकारला उत्पादन दिलं नाही तर सरकार शेतकऱ्यासोबतचा करार रद्द करते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी व्यसनी पोपटांपासून अफूच्या पिकांचं संरक्षण करण्याकरता प्लास्टिक नेट लावली आहे.

- Advertisement -

प्लास्टिक नेट लावल्याने पिकांचं नुकसान कमी झालं आहे. पूर्वी पोपट मोठ्या प्रमाणात अफूची बोंडे आपल्या चोचीत घेऊन उडून जायचे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं. आता प्लास्टिक नेट लावल्याने पोपटांची संख्या कमी झाली आहे. पोपटांसह नीलगायींचाही मोठा धोका अफूच्या शेतीवर असल्याचं बोललं जात आहे.

अफूची शेती जानेवारी ते मार्च दरम्यान केली जाते. अफूची रोपटी लहान असतात तेव्हा त्याची विक्री भाजीबाजारात केली जाते. एवढंच नव्हे तर अफूच्या बोंडूची भाजीही केली जाते. ही अफू केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करतं. यापासून मार्फिन तयार केलं जातं. तसंच, इतर अनेक पदार्थही तयार केले जातात. यामुळे हृदयविकारावरील औषध, रक्तासंबंधीत रोगवर असलेली औषधं, मानसिक रोगाशी संबंधित औषधं बनवली जातात. तर, अफूची तस्करी केल्यास एनडीपीएस अतंर्गत गुन्हा दाखल केला जातो. यामध्ये जास्तीत जास्त १० वर्षे आणि १ लाख रुपयांची दंडाची शिक्षा सुनावण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -