घरदेश-विदेशदिलासादायक : राज्यात 619 नवे कोरोनाबाधित, 686 जणांची मात

दिलासादायक : राज्यात 619 नवे कोरोनाबाधित, 686 जणांची मात

Subscribe

मुंबई : राज्यात कोरोनाच्या बाबतीत दिलासादायक चित्र आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत हळूहळू घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 619 इतक्या नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 686 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्क्यांवर आले आहे. आतापर्यंत राज्यामध्ये 79,66,768 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज 619 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून एकूण सक्रिय रुग्ण 3 हजार 709 आहेत. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 752 रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 457 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला आहे.

- Advertisement -

देशातही रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट
देशभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या संपूर्ण देशभरामध्ये एकूण 44,436 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत देशात 4,912 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्याच्या एक दिवसआधी देशात 5,383 कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र आजच्या तुलनेत 441 रुग्ण घटले आहेत. 5,719 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, कोरोनामुळे 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -