घरदेश-विदेशGood News! भारतात ऑक्टोबरमध्ये येणार J&J कोरोना लसीचा पहिला लॉट

Good News! भारतात ऑक्टोबरमध्ये येणार J&J कोरोना लसीचा पहिला लॉट

Subscribe

देशात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू असून पुर्णतः कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि तो नियंत्रणात रहावा म्हणून देशभरात वेगवान लसीकरण मोहीम देखील सुरू आहे. अशापरिस्थितीत भारतीयांना दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे भारतात पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये J&J कोरोना लसीचा पहिला लॉट येणार आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण आणखी वेगवान होण्यास मदत होणार असून कोरोना विषाणूविरोधातील लढाईत देशाला लवकरच J&J लसीचा आधार मिळू शकतो.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, भारत ऑक्टोबरमध्ये J&J कोरोना लसीचा पहिला लॉट घेण्यास तयार आहे. भारताच्या भागीदारीत औषध तयार करणारी अमेरिकन कंपनी भारतातच लसीला अंतिम रूप देणार आहे. यासह, भारताला या सिंगल शॉट लसीचे ४३.५ मिलियन डोस ऑक्टोबरमध्ये मिळू शकतात. दर महिन्याला ३०० मिलियन कोरोना लस डोस तयार करण्याच्या भारताच्या उद्दिष्टाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. भारत हे जगातील लस निर्मितीचे सर्वात मोठे केंद्र मानले जात आहे. एप्रिलमध्ये भारताने लसीची निर्यात बंद केली होती. मात्र ज्यावेळी भारत आवश्यक मानके पूर्ण करू शकेल तेव्हा भारत पुन्हा एकदा लस निर्यात करू शकणार असल्याचे सांगितले जात आहे. बायो ई नावाची कंपनी ही लस तयार करणार असून ही लस पाच मिली कुपीमध्ये उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

नुकतेच भारतीय औषध नियामकाने जॉन्सन अँड जॉन्सन लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. मात्र भारत सरकारने पुरवठा कराराबाबत जॉन्सन अँड जॉन्सनसोबत कोणताही करार केलेला नाही. त्याचवेळी, जॉन्सन अँड जॉन्सन इंडियाकडून असे सांगितले गेले की, लसीच्या वितरणाच्या वेळेचा अंदाज करणे अयोग्य ठरेल.


राज्यपालांकडून संसदीय अधिवेशनाच्या मागणीची नवीन परंपरा – नाना पटोले

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -