घरदेश-विदेशभारतीय लष्कराचे प्रत्युत्तर; ४ पाकिस्तानी सैनिक ठार, अनेक जखमी

भारतीय लष्कराचे प्रत्युत्तर; ४ पाकिस्तानी सैनिक ठार, अनेक जखमी

Subscribe

जम्मू विभागातील पुंछ जिल्ह्यातील बालाकोट आणि मेंढर सेक्टरमध्ये रविवारी रात्री उशिरा पाकिस्तान सैन्याने जोरदार गोळीबार

जम्मू विभागातील पुंछ जिल्ह्यातील बालाकोट आणि मेंढर सेक्टरमध्ये रविवारी रात्री उशिरा पाकिस्तान सैन्याने जोरदार गोळीबार केला. रात्री उशिरा झालेल्या भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात चार पाकिस्तानी सैनिक ठार झाले तर अनेक जखमी झाले. यामध्ये काही पाक चौक्यांचेही नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सर्व मार्गांवर सैनिकांची गस्त वाढविण्यात आली आहे. पाक सैन्य दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी गोळीबार करत असतं. संध्याकाळी सात वाजता पाक सैन्याने बालाकोट, मेंढर सेक्टरमधील सैन्यांच्या चौक्या आणि निवासी भागात १२० मिमी मोर्टारने गोळीबार करण्यास सुरूवात केली.

गोळीबारामुळे सीमाभागातील लोकांमध्ये दहशत

यावेळी भारतानेही त्याला प्रत्युत्तर दिले. यानंतर सीमेपार सुरू असलेला गोळीबार आधून-मधून सुरूच होता. दरम्यान रात्री उशिरापर्यंत पाक सैन्याने सतत गोळीबार सुरूच ठेवला. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सेनेने दोन्ही सेक्टरमध्ये रात्री उशिरा जोरदार गोळीबार केला, त्यात पाक सैन्याच्या सुभेदारसह चार सैनिक ठार झाले तर सहाहून अधिक सैनिक जखमी झाले. यावेळी अनेक चौक्यांवरून धूरही दिसला. तर सीमेपलीकडे अनेक रुग्णवाहिका दिसल्या. पाक गोळीबारामुळे सीमाभागातील लोकांमध्ये भितीचे वातावरण होते.

- Advertisement -

भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर

जम्मू विभागातील पुंछ जिल्ह्यातील बालाकोट आणि मेंढर सेक्टरमध्ये रविवारी रात्री उशिरा पाकिस्तान सैन्याने जोरदार गोळीबार केला. भारतीय लष्कराने देखील याला जशाच तसे प्रत्युत्तर दिले. यावेळी काही पाक चौक्यांचे नुकसान झाले आहे. चोख प्रत्युत्तर मिळाल्यानंतरही पाकिस्तानकडून अधून मधून गोळीबार केला जात आहे. तर नियंत्रण सीमेवरील सर्व मार्गांवर सैन्याची गस्त वाढविण्यात देखील आली आहे. यावेळी पाक दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी गोळीबार केला. यानंतर भारतीय सैन्याने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात काही पाक चौक्यांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.


चीनची नवी खेळी; भूटानलगतच्या सीमेवरही केला दावा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -