घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: गरीब देशांमध्ये होऊ शकते ऑक्सिजनची कमतरता; शास्त्रज्ञांनी दिला इशारा

Coronavirus: गरीब देशांमध्ये होऊ शकते ऑक्सिजनची कमतरता; शास्त्रज्ञांनी दिला इशारा

Subscribe

वैज्ञानिक कोविड -१९ ची लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, रुग्णांना वाचवण्यात ऑक्सीजनची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मात्र, गरीब देशांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे.

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर अद्याप लस अद्याप सापडलेली नाही. वैज्ञानिक कोविड -१९ ची लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, रुग्णांना वाचवण्यात ऑक्सीजनची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मात्र, गरीब देशांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. या महामारीमुळे प्रगत आरोग्य सेवा असणार्‍या देशांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. संक्रमित रुग्णांना श्वास घेण्यास मदत करण्यासाठी व्हेंटिलेटरचा पुरवठा केला जात आहे. तथापि, शास्त्रज्ञांना भीती आहे की व्हेंटिलेटर प्रभावी उपचार असल्याचा समज झाला आहे आणि गरीब आणि कमकुवत आरोग्य प्रणाली असलेल्या देशांसमोर एक चुकीचं चित्र निर्माण केलं गेलं आहे. मेलबर्न विद्यापीठ रुग्णालय व आंतरराष्ट्रीय बाल आरोग्य केंद्रातील बालरोगतज्ज्ञ हमीश ग्रॅहम म्हणतात, “आफ्रिका आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात ऑक्सिजन ही एकमेव थेरपी आहे. ज्याने रुग्णांना वाचवलं जात आहे.” मात्र पुढे ऑक्सिजनची कमतरता भासू शकते.

ते म्हणाले, ‘मला भीती वाटते की ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्चित केल्याशिवाय व्हेंटिलेटरवर लक्ष केंद्रित केल्यास मृत्यू होतील. तथापि, हजारो चिनी रूग्णांच्या आधारे तयार केलेला अहवाल फेब्रुवारीमध्ये आला होता, त्यानुसार कोविड -१९ रुग्णांपैकी सुमारे २० टक्के रुग्णांना ऑक्सजीनची आवश्यकता होती. यापैकी १४ टक्के रुग्णांना सामान्य ऑक्सिजन थेरपीची आवश्यकता लागली तर पाच टक्के लोकांना व्हेंटिलेटरची गरज लागली.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: नागरी उड्डाण मंत्रालय सील; कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण


दरम्यान, कोरोना जगभर तांडव करत आहे. जगभरात कोरोनाचे २५ लाख ८५ हजार १९७ रुग्ण आहेत. तर १ लाख ७९ हजार ८३९ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, ७ लाख ५ हजार ७१८ जण बरे झाले आहेत. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक ८ लाख १९ हजार ३२१ रुग्ण आहेत. तर सर्वाधिक मृत्यू देखील अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत ४५ हजार ३५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -