Coronavirus: स्पेनमध्ये करोनाचा कहर; २४ तासांमध्ये ७१८ जणांचा मृत्यू

स्पेनमध्ये करोनाचे ५७ हजार ७८६ रुग्ण आढळले आहेत.

corona patients in spain
स्पेनमध्ये २४ तासांमध्ये ७१८ जणांचा मृत्यू

चीनच्या वुहानपासून सुरु झालेल्या करोनाने जगातील सर्वच देशांना आपल्या विळख्यात घेतले आहे. करोनाने जगभर आपले पाय पसरले आहेत. चीन, इटली आणि अमेरिकानंतर करोना स्पेनमध्ये थैमान घालत आहे. स्पेनमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये करोनाचे ५७ हजार ७८६ रुग्ण आढळले आहेत. तर ४ हजार ३६५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कॅटालोनियामध्ये जवळपास १० हजार, तर बास्क कंट्री आणि अंडालुशिया या दोघांमध्ये तीन हजारहून अधिक करोनाचे रुग्ण आहेत. परंतु सर्वात जास्त प्रभावित प्रदेश म्हणजे राजधानी माद्रिदच्या आसपासचा परिसर आहे. माद्रिदमध्ये १४ हजार ५९७ करोनाचे रुग्ण आढळले आहेत.

spain


हेही वाचा – Lockdown: लग्नाची वरात थेट पोलीस ठाण्यात

स्पेनमध्ये करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची कमतरता आहे. रुग्णांना जमीनीवर झोपून, खूर्च्यांवर बसून उपचार घ्यावे लागत आहेत. काही जणांचा मृत्यू झाल्यानंतर कित्येक दिवस त्यांचे शव घरातच पडून होते. सध्या स्पेनमध्ये विदारक परिस्थिती आहे. युरोपमध्ये करोनाग्रस्तांचा आकडा २ लाख ८४ हजार २८९ वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा १६ हजार ३८१ वर पोहोचला आहे. जगभरात करोनाचे ५ लाख ३७ हजार १७ रुग्ण आहेत. तर २४ हजार ११७ जणांचा मृत्यू झाला आहे.