घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटLockdown: स्पेनमध्ये रस्त्यावर फिरण्यासाठी नागरिकांची नामी शक्कल!

Lockdown: स्पेनमध्ये रस्त्यावर फिरण्यासाठी नागरिकांची नामी शक्कल!

Subscribe

लॉकडाऊन दरम्यान फक्त तोच व्यक्ती बाहेर पडेल. ज्याच्याकडे घरात पाळीव प्राणी आहे. तर या पाळीव प्राण्यांना बाहेर फिरवण्यासाठी व्यक्ती बाहेर पडू शकतो.

कोरोना व्हायरसच्या सावटामध्ये सध्या स्पेनमधील नागरिक हातात कोंबडी आणि फिश बाऊल घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहे. जगभरात कोरोनाचे जास्त रुग्ण स्पेनमध्ये ही आढळून आले आहेत. त्यामुळे स्पेनमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊन काळात येथील नागरिक एका वेगळ्याच अंदाजात फिरताना दिसत आहेत. चला तर मग याच्या मागचे खरे कारण काय आहे हे जाणून घेऊया. स्पेनमध्ये लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरामध्ये राहण्याचा आदेश दिला आहे. आणि यावेळी एक नियम बनविण्यात आला आहे, लॉकडाऊन दरम्यान फक्त तोच व्यक्ती बाहेर पडेल. ज्याच्याकडे घरात पाळीव प्राणी आहे. तर या पाळीव प्राण्यांना बाहेर फिरवण्यासाठी व्यक्ती बाहेर पडू शकतो. मात्र, येथील नागरिकांनी बाहेर पडण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्पेनमध्ये लॉकडाऊन दरम्यान लोक आपल्या हातात कोंबडी आणि फिश बाऊल सोबत रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

- Advertisement -

 

स्पॅनिश नॅशनल पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर हँडलवरून एक फोटो ट्विट केला होता. लोग्रोनो शहरात एक व्यक्तीवर दंड आकारण्यात आला. कारण लॉकडाऊन दरम्यान हातात फिश बाऊल घेऊन रस्त्यावरून फिरत होता. या फोटोला ट्विट करत स्पॅनिश पोलिसांनी लिहिले की, हा सरकारी आदेशाचे उल्लंघन करत आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, या व्यक्तीने फिश बाऊल बेंचवर ठेवले आहे.

- Advertisement -

 

ट्विटरवर स्पेनच्या लोकांचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. आतापर्यंत फोटो आणि व्हिडीओला ७,५०० हुन अधिक लाईक मिळाले आहेत. दुसरीकडे स्पेनिश सिव्हिल गार्डने ही एक व्हिडिओ ट्विट केले आहे. याला सोशल मीडियावर सर्वाधिक जास्त पसंती मिळाली आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कोंबडीला कुत्र्याचा पत्ता घालून रस्त्यावरून फिरवत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ट्विटरवर ७८ हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. याशिवाय हजाराहून अधिक नेटकऱ्यानी कमेंट केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -