बलात्काराच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियात श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलकाला अटक

श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. श्रीलंकाने इंग्लंडिविरोधात शनिवारी टी-20 विश्वचषकातील अखेरचा सामना खेळला.

श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. श्रीलंकाने इंग्लंडिविरोधात शनिवारी टी-20 विश्वचषकातील अखेरचा सामना खेळला. या सामन्यातनंतर लगेचच गुणतिलकाला अटक करण्यात आली. (In Sydney Sri Lanka Cricketer Danushka Gunathilaka Arrested In Rape Case T20 World Cup)

ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बलात्काराच्या आरोपाखाली दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. त्यानुसार, सिडनीत गेल्या आठवड्यातील घटनेप्रकरणी शनिवारी मध्यरात्री 1 वाजता सुसेक्स स्ट्रीट हॉटेल येथून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टारला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

गुणतिलकावरील नेमका आरोप काय?

डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेट झालेल्या 29 वर्षीय तरुणीने गुणतिलकावर बलात्काराचा आरोप केला आहे. सिडनी येथे गेल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. याप्रकरणी गुणतिलकाला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, या अटकेच्या कारवाईनंतर श्रीलंका संघ दनुष्का गुणतिलकाला मागे सोडून मायदेशी रवाना झाला आहे. टी-20 विश्वचषकासाठी श्रीलंका संघासह ऑस्ट्रेलियात दाखल झालेला गुणतिलका जखमी झाल्याने संघाबाहेर गेला होता. अशीन बंडाराने संघात त्याची जागा घेतल्यानंतरही तो संघासह थांबला होता.


हेही वाचा – टी-20 विश्वचषक : झिम्बाब्वेला हलक्यात घेणे भारतीय संघाच्या येऊ शकते अंगलट