Coronavirus: तामिळनाडूमध्ये बनवला सॅनिटायझर बोगदा

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी तिरुपूर जिल्ह्यात बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा बाजाराच्या प्रवेश द्वारावर लावला आहे. जर कोणीही बाजारपेठेत आला तर प्रथम त्यांना या बोगद्यातून जावे लागणार आहे.

disinfection tunnel
तामिळनाडूमध्ये बनवला सॅनिटायझर बोगदा

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशात संसर्ग झालेल्यांची आकडा १ हजार ५९० वर पोहोचला आहे आणि आतापर्यंत ४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्येही गेल्या दोन दिवसांत संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यानंतर कोरोना विषाणू थांबविण्यासाठी तमिळनाडू सरकारने सर्व उपाययोजना केल्या आहेत. तामिळनाडूमधील तिरुपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी एक सॅनिटायझरचा बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा बाजाराच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. जर कोणीही बाजारपेठेत आले तर प्रथम त्यांना या बोगद्यातून जावे लागेल. या लहान बोगद्यात ३-५ सेकंद अंतर पार करावे लागते आहे. या दरम्यान त्यावर सॅनिटायझर फवारले जाते.


हेही वाचा – लॉकडाउनची ऑर्डर असूनही तबलीगी जमातीचा कार्यक्रम कसा चालला?


मंगळवारी रात्रीपर्यंत तामिळनाडूमध्ये कोरोनाची १२४ प्रकरणे नोंदली गेली आहेत. दिल्लीतील निजामुद्दीनमधील तबलीघी जमातीच्या संपर्कात आलेल्या ५० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. सध्या सर्व लोकांना आयसोलेशन वॉर्डामध्ये ठेवण्यात आले आहे.

तामिळनाडू सरकारच्या म्हणण्यानुसार, राज्यातून १५०० लोक तबलीघी जमातीच्या कार्यक्रमात गेले होते. यामधील ११३० लोक परत आले आहेत. परत आलेल्या लोकांपैकी 515 लोकांची ओळख पटली आहे. या ५१५ लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती, त्यातील ५० जणांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. याशिवाय उर्वरित लोकांचा शोध घेण्यात येत आहे.