Coronavirus Cases Today : देशात गेल्या २४ तासांत २ हजार ७४५ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर सहा रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना विषाणूचा (Corona Virus) कहर अद्यापही सुरूच आहे. मात्र, एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रूग्णांमध्ये घट झाल्यानंतरही आज पुन्हा एकदा कोरोना रूग्ण वाढले आहेत. देशात गेल्या २४ तासांत २ हजार ७४५ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल मंगळवारी सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २ हजार २३६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ४ कोटी २६ लाख १७ हजार ८१० रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत ०.०४ टक्के इतके अॅक्टिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर ९८.७४ टक्के रिकव्हरी रेट आहे. ४ कोटी २६ लाख १७ हजार ८१० इतके एकूण रूग्ण बरे झाले आहेत.

देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत १९३ कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या ७११ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिल्लीमध्ये कोरोनाचे ३७३ तर तामिळनाडूमध्ये १०० नवे रुग्ण सापडले आहेत.

दिल्लीत २.१५ रूग्ण झाले बर 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिल्लीत ३७३ नवीन प्रकरणे आणि एक मृत्यू नोंदवला गेला आहे, तर २५५ रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत सकारात्मकता दर २.१५ टक्के आहे. दिल्लीत एका दिवसात कोरोनाच्या १७,३७१ चाचण्या करण्यात आल्या.

मध्य प्रदेश आणि राजस्थान कोरोना अपडेट

मध्य प्रदेशात कोरोनाचे २० नवीन रुग्ण आढळून आले असून, त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या १० लाख ४२ हजार ५०० च्या पुढे गेली आहे. राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही, त्यामुळे कोरोनामुळे मृतांचा आकडा १०७३६ वर राहिला आहे. राज्यात कोरोनाच्या ४८३४ चाचण्या झाल्या. त्याचवेळी, राजस्थानमध्ये ५७ नवीन रुग्ण आढळले आहेत, एकही मृत्यू झालेला नाही. राजस्थानमध्ये कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ५३२ वर पोहोचली आहे आणि एकूण रुग्णांची संख्या १२ लाख ८५ हजार ७०० च्या पुढे गेली आहे.


हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : आज अयोध्येत होणार राम मंदिर गाभाऱ्याची पायाभरणी, मुख्यमंत्री योगींच्या हस्ते शुभारंभ