घरCORONA UPDATEदिलासा! देशात गेल्या २४ तासांत ५७ हजार ३८६ रुग्णांची कोरोनावर मात

दिलासा! देशात गेल्या २४ तासांत ५७ हजार ३८६ रुग्णांची कोरोनावर मात

Subscribe

देशात गेल्या २४ तासांत ४८ हजार ६४८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांची संख्या ८० लाख ८८ हजार ८५१ इतकी झाली आहे. तर एका दिवसांतील मृतांची संख्या ५६३ असून आतापर्यंत १ लाख २१ हजार ०९० जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात एकूण ५ लाख ९४ हजार ३८६ सक्रिय रुग्ण असून गेल्या २४ तासांत ९ हजार ३०१ जणांची वाढ त्यात झाली आहे. तसेच देशातील रिकव्हरी रेटदेखील वाढत असून काल दिवसभरात ५७ हजार ३८६ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत ७३ लाख ७३ हजार ३७५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात काल १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३३, ठाणे ७, नवी मुंबई मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा ६, नाशिक ३, पुणे ९, पिंपरी चिंचवड मनपा १२, सोलापूर ११, सातारा ७, सांगली ७, नांदेड ८, नागपूर १० यांचा समावेश आहे. आज ७,८८३ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १४,९४,८०९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८८,३७,१३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,६६,६६८ (१८.८६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,३३,६८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा –

PUBG Mobile: भारतात आजपासून PUBG गेमवर बंदी, कंपनीने केला खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -