Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ; जाणून घ्या २४ तासांत किती रुग्ण...

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ; जाणून घ्या २४ तासांत किती रुग्ण वाढले

Subscribe

मुंबई | देशात सलग चार दिवसांत कोरोना (covid-19) रुग्णांच्या संख्येत घसरण झाली. यानंतर आता पुन्हा कोरोना संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची एकूण ३ हजार ७२० एवढी झाली आहे. मंगळपारपर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार ३२५ एवढी नोंद झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालायाने (Ministry of Health India) दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ७ हजार ६९८ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी, आता सक्रिय रुग्णांची संख्या ४० हजार १७७ वर पोहोचली आहे. तर मंगळवारी एकूण कोरोनाचे सक्रिय संख्या ४४ हजार १७५ एवढी आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत कोरोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत ५ लाख ३१ हजार ५८४ वर गेली आहे. आतापर्यंत देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४ कोटी ४९ लाख ५६ हजार ७१६ झाली आहे. तर ४ कोटी ४३ लाख ८४ हजार ९५५ लोकांना कोरोनामुक्त झाले आहे. सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्ण संख्येत ०.०९ एवढा झाला आहे तर मृत्यूदर १.१८ वर झाली आहे.

देशात एवढ्या लोकांनी घेतले कोरोनाची लस 

- Advertisement -

देशात आतापर्यंत २२०.६६ कोटीहून अधिक लोकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशात १०२.७४ कोटीपेक्षा जास्त लोकांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे तर, ९५.१९ कोटीहून अधिक लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच २२.७२ कोटीपेक्षा जास्त बुस्टर डोस देण्यात आला आहेत.

 

- Advertisment -