श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींची आणखी घसरण

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. या अहवालानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत अदानी समूहाचे मार्केट कॅप १२० डॉलर अब्जाने कमी झाले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अदानीची एकूण संपत्ती $१.१५ अब्जावरून घसरून ती $४९.१ अब्ज झाली आहे.

Gautam Adani will soon enter the list of top 20 rich people

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. या अहवालानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत अदानी समूहाचे मार्केट कॅप १२० डॉलर अब्जाने कमी झाले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अदानीची एकूण संपत्ती $१.१५ अब्जावरून घसरून ती $४९.१ अब्ज झाली आहे. त्यामुळे जगातील श्रीमंतांच्या यादीत अदानी आता २५व्या क्रमांकावर घसरले आहे. (in the list of the worlds richest people industrialist gautam adani slipped to 25th position)

उद्योगपती गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $७१.५ अब्जने घसरली आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आणि त्याची एकूण संपत्ती $१५० अब्जच्या जवळपास पोहोचली होती.

अमेरिकन रिसर्च फर्मच्या अहवालानंतर ते या यादीतील टॉप २० मधूनही बाहेर पडले. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अजूनही घसरण पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत २१ व्या क्रमांकाच्या खाली घसरले आहेत. सध्या ते श्रीमंतांच्या यादीत २५ व्या क्रमांकावर आहेत.

फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट $१९२ अब्ज संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. एलन मस्क, टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटरचे मालक, १८७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस ($१२१ अब्ज) तिसऱ्या, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स ($११७ अब्ज) चौथ्या क्रमांकावर आहेत. तसेच, या यादीच्या पहिल्या १० मध्ये, अनुभवी गुंतवणूकदार वॉरेन बफे ($१०७ अब्ज) पाचव्या, लॅरी एलिसन ($१०२ अब्ज) सहाव्या, स्टीव्ह बाल्मर ($ ९२.१ अब्ज) सातव्या, लॅरी पेज ($ ८८.६ अब्ज) आठव्या, कार्लोस स्लिम ($ ८४.९ अब्ज) अब्ज डॉलर) नवव्या आणि सर्जी ब्रिन ($ ८४.८ अब्ज) दहाव्या क्रमांकावर आहेत. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी ८३.६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ११ व्या क्रमांकावर आहेत.


हेही वाचा – पाकिस्तानातील आर्थिक सकंटाला राजकारणी आणि नोकरशाह जबाबदार, संरक्षणमंत्र्याची टीका