घरताज्या घडामोडीभारतीयांना लवकरच चौथी कोरोना लस होणार उपलब्ध! zydus cadila च्या मान्यतेसाठी अर्ज...

भारतीयांना लवकरच चौथी कोरोना लस होणार उपलब्ध! zydus cadila च्या मान्यतेसाठी अर्ज करणार

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. देशात सध्या कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या तीन कोरोना लसींचा वापर करून नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. हे लसीकरण सुरू असताना मोठ्या प्रमाणात कोरोना लसींचा तुटवडा देशात जाणवत आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत देशातील भारतीयांसाठी मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. येत्या ७ ते १० दिवसांत झायडस कॅडिला या कोरोना लसीच्या आपतकालीन वापराच्या परवानगीसाठी अर्ज करणार आहे. त्यामुळे भारतीयांना लवकरच कोरोनाची चौथी लस उपलब्ध होणार आहे.

देशातील कोरोना महामारी दूर करण्यासाठी कोरोना लसीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या तीन लस सरकारने नुकतीच मंजूर केल्या आहेत. मात्र देशात कोरोना लसीचा तुटवडा भासत असताना झायडस कॅडिला या कोरोना लसीच्या परवानगीची बातमी चिंता दूर करणारी ठरू शकते. अहमदाबाद येथील फार्मा कंपनी झायडस कॅडिला हे फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठे नाव आहे. याच कंपनीने कोरोना लस देखील बनविली असून तिचे नाव ZyCoV-D असे आहे. ज्याचे उत्पादन जूनपासून सुरू होणार असल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. त्यानंतर आज शुक्रवारी झायडस कॅडिला ही कोरोना लस लवकरच आपतकालीन वापराच्या परवानगीसाठी  अर्ज दाखल करणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मुलांसाठी नोव्हावॅक्स लसीची क्लिनिकल चाचणी सुरू करण्याचा विचार करीत आहे. जुलैपासून सीरम इन्स्टिट्यूट संस्था कोविड -१९ या लसीची चाचणी सुरू करणार आहे, असे सूत्रांनी गुरुवारी सांगितले. यासह, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सप्टेंबरपर्यंत कोव्हाव्हॅक्स भारतात उपलब्ध करणार आहे. कोव्हावॅक्स हे नोव्हावॅक्सच्या संभाव्य कोविड लशीचे रूप आहे. यापूर्वी केंद्र सरकारनेही कोरोना विरूद्ध नोव्हाव्हॅक्स ही लस परिणामकारक असल्याचे वर्णन केले होते. नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,
सार्वजनिकपणे उपलब्ध आकडेवारीही असे दर्शवते की, नोव्हाव्हॅक्स ही लस सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -