घरताज्या घडामोडीकर्नाटकात सिद्धरामय्याच किंग; CM पदाच्या शर्यतीत हे मुद्दे ठरले डी.के. शिवकुमार यांच्यावर भारी

कर्नाटकात सिद्धरामय्याच किंग; CM पदाच्या शर्यतीत हे मुद्दे ठरले डी.के. शिवकुमार यांच्यावर भारी

Subscribe

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या हेच किंग ठरले आहेत. हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. सिद्धरामय्या यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यास दिल्यानंतर डी.के.शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली आहेत. दोन्ही नेत्यांनी सत्ता परिवर्तनासाठी कंबर कसली असून मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चुरस सुरू होती. पण हायकमांडचा निर्णय दोघांनीही मान्य करण्याचे ठरवले होते. त्यामुळे काही मुद्दे हे डी.के. शिवकुमार यांच्यावर भारी पडले आहेत.

सिद्धरामय्या हे कर्नाटकातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत. कर्नाटकात भाजपच्या हिंदुत्व कार्डाचा सामना करण्यासाठी काँग्रेसने सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. निवडणूकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचं नेतृत्व करत ‘जितनी आबादी, उतना हक’ची मागणी लावून ‘ओबीसी आणि दलित कार्ड’चे मुद्दे उपस्थित केले. राहुल गांधी एका सभेत म्हणाले होते की, पंतप्रधानांना जर ओबीसींना सत्ता द्यायची असेल तर आधी त्यांना समजून घ्यावं लागेल की, देशात किती ओबीसी आहेत. हेच कळत नसेल तर त्यांना सत्ता कशी देणार?, असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला होता.

- Advertisement -

सिद्धरामय्या हे देखील कुरुबा समाजातून (ओबीसी) समाजातून येतात. ते राज्यातील सर्वात मोठे ओबीसी नेते मानले जातात. अशा परिस्थितीत 2024 च्या निवडणुकीत ओबीसींची मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेसकडे सिद्धरामय्या यांच्यापेक्षा चांगला चेहरा नव्हता. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री असताना गरिबांसाठी अशा अनेक योजना सुरू केल्या होत्या, त्यामुळे ते राज्यातील सामाजिक न्यायाचा चेहरा म्हणून उदयास आले. मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात जातिगत जनगणना केली होती.

सिद्धरामय्या यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत 12 निवडणुका लढवल्या, त्यापैकी 9 जिंकल्या. सिद्धरामय्या 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. यापूर्वी ते 1994 मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री होते. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ अतिशय उत्तम प्रकारे पार पाडला. या काळात त्यांची प्रशासकीय जबाबदारी चांगली होती. यामुळेच पक्षाने त्यांना डी.के. शिवकुमार यांच्यापेक्षा जास्त महत्त्व दिले. एवढेच नाही तर सिद्धरामय्या हे कर्नाटकचे तिसरे मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी 2013 ते 2018 पर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण केला होता.

- Advertisement -

कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज सायंकाळी 7 वाजता बंगळुरु येथे बैठक पार पडणार आहे. आमदरांना या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आलं आहे. बुधवारी दिवसभर मल्लिकार्जुन खरगे यांचं नवी दिल्लीत बैठकांचं सत्र सुरु होतं, अखेर मध्यरात्री प्रश्न सोडवण्यात त्यांना यश आलं आहे. कर्नाटकमध्ये नव्या सरकारचा शपथविधी 20मे रोजी होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.


हेही वाचा : ठरलं! कर्नाटकला ‘या’ तारखेला मिळणार नवा मुख्यमंत्री; खर्गेंनी सोडवला तिढा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -