Corona : महाराष्ट्रासह ‘या’ चार राज्यात मिळून ७० टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू

american scientist found the series of symptoms of corona virus in human body
Corona: कोरोनाची लागण झाल्यावर सर्वात पहिल्यांदा दिसतील 'ही' लक्षणे!

देशात सुरूवातीपासूनच महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आढळून आली आहे. आता पुन्हा एकदा राज्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. आज, मंगळवारी दिल्लीत झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह इतर चार राज्यांत मिळून देशात ७० टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांचा समावेश आहे. दिल्लीत आज आरोग्य मंत्रालयासह निती आयोगाची एकत्रित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी देशातील कोरोना स्थितीवर माहिती दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले की, कोरोना प्रकरणातील मृत्यूचे प्रमाण सतत कमी होत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते २.१५ टक्को होते, आता ते १.७० टक्के आहे. साधारण १४ राज्यांमध्ये ५००० पेक्षा कमी कोरोनाबाधित आहेत.

दरम्यान, निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी माहिती दिली की, रशियाने विकसित केलेली लस देशाच्या विचाराधीन आहे. रशिया सरकारने आमच्या सरकारकडे संपर्क साधला आणि दोन कंपन्यांकडे मदत मागितली. आमच्या कंपन्यांच्या नेटवर्कद्वारे त्याचे उत्पादन विचारात घ्यावे आणि भारतातील तिसरा टप्पा अभ्यास करावा. तसेच या देशातील एका खास मित्राकडून मिळालेल्या भागीदारीच्या या ऑफरला भारत सरकार खूप महत्त्व देत आहे आणि या दोन्ही मागोमाग एक महत्त्वपूर्ण हालचाल झाली आहे.

हेही वाचा –

कोविडचा भ्रष्टाचार म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे; फडणवीसांनी काढली सरकारची लक्तरं