घरताज्या घडामोडीIndia Corona Update: दिलासादायक! महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये पूर्वीपेक्षा रुग्णसंख्येचा वेग झाला कमी

India Corona Update: दिलासादायक! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पूर्वीपेक्षा रुग्णसंख्येचा वेग झाला कमी

Subscribe

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे काही राज्यांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैज्ञानिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आणखीन टेन्शन वाटले आहे. यादरम्यान आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांनी दिलासादायक बाब सांगितली आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोना रुग्णसंख्येचा वेग हळूहळू कमी होत असल्याचे सांगितले आहे.

देशातील कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने केंद्राची आज पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळेस अतिरिक्त सचिव आरती आहुजा म्हणाल्या की, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि बिहारमध्ये सर्वाधिक कोरोनाची प्रकरणे आहेत. पण महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, आणि झारखंड सारख्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, जिथे पूर्वी कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. परंतु आता हळूहळू कोरोना रुग्णसंख्या वाढण्याचा वेग कमी झाला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

पुढे आरती आहुजा म्हणाल्या की, ‘कोरोनाचा ट्रेंड वरच्या दिशेने जात असलेली राज्य पाहिली तर त्यामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, हरयाणा, ओडिसा आणि उत्तराखंड अशी राज्य आहेत. तसेच पंजाब, जम्मू-काश्मीर, आसाम, हिमाचल प्रदेश, पद्दुचेरी, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड येथे दररोज कोरोना ट्रेंड वाढत आहे.’

दरम्यान १८ ते ४४ वयोगटातील ११.८१ लाख जणांचा कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत सर्व वयोगटातील लोकांना १६.५० कोटी डोस दिले गेले आहेत, अशी माहिती आरती आहुजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.


हेही वाचा – Corona Vaccination: औरंगाबाद प्रशासनाचा भोंगळ कारभार, सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -