घर देश-विदेश 'या' जिल्ह्यात मुलं चालवणार शाळा, शिक्षक फक्त हजेरी लावणार; शिक्षण विभागाकडून फर्मान जारी

‘या’ जिल्ह्यात मुलं चालवणार शाळा, शिक्षक फक्त हजेरी लावणार; शिक्षण विभागाकडून फर्मान जारी

Subscribe

नवी दिल्ली : बिहारच्या रोहतास जिल्ह्यात आता मुलं शाळेत शिक्षकाची भूमिका बजावताना दिसणार आहेत, तर शिक्षकांना शाळेत फक्त हजेरी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक शाळेला पत्र देऊन त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. (In Bihar’s Rohtas district, children will now be seen playing the role of teachers in schools, while teachers have been instructed to just attend schools)

बिहारच्या रोहतास जिल्ह्यात शिक्षण विभागाने जातनिहाय जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याबाबत हे फर्मान काढले आहे. शाळेतील कामकाज संपल्यानंतर शिक्षक जनगणनेसाठी जाऊ शकतात असा पर्याय शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. मात्र या आदेशामुळे पालकांमध्ये नाराजी आहे. कारण कधी निवडणुका, कधी शिक्षक नियोजन, जनगणना आणि परीक्षांच्या कामांमध्ये शिक्षक व्यस्त असल्यामुळे सरकारी शाळांमध्ये अनेकदा अभ्यासात व्यत्यय येतो.

- Advertisement -

वरच्या वर्गातील विद्यार्थी शिकवणार
जिल्हा शिक्षणाधिकारी संजीव कुमार यांनी पत्रात म्हटले आहे की, दुसऱ्या टप्प्यातील जात-आधारित जनगणनेच्या कामासाठी ज्या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे, ते शाळेच्या वेळेत कधीही शाळेमध्ये पोहचून आपली उपस्थिती नोंदवू शकतात. यावेळी वर्गाचे नियोजन आणि अभ्यासाचा संबंध येत असल्यास मुख्याध्यापक वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना खालच्या वर्गात शिकवण्यासाठी पाठवू शकतात.

स्मार्ट क्लासचा आदेश शिक्षकांना अमान्य
शिकवण्याचे काम स्मार्ट क्लासच्या माध्यमातून करता येऊ शकते. इतकेच नव्हे तर क्लास मॉनिटरद्वारे योग्य नियोजन केल्यास शिक्षक आणि पाठ्यपुस्तकाच्या मदतीने वर्ग चालवता येतो. मात्र, विभागीय अधिकाऱ्यांचा हा आदेश अनेक शिक्षकांना मान्य नाही आहे.

- Advertisement -

जनगणनेसाठी सरकारकडून वेगळे मानधन
सध्या शाळा सकाळी सुरू होत असून साडेदहापर्यंत संपतात असे अनेक शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जनगणनेच्या कामासाठी नेमलेल्या शिक्षकांना केवळ हजेरी लावण्यासाठी शाळेत बोलावण्याचे आदेश योग्य वाटत नाही. एवढेच नाही तर जनगणनेच्या कामासाठी नेमणूक करण्यात आलेल्या शिक्षकांना दहा हजार मानधनाची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.

इतर जिल्ह्यात शिकवणीसह जनगणनेचे काम करण्याच्या सूचना
बिहारच्या रोहतास जिल्ह्याच्या शेजारील भोजपूर, बक्सर आणि इतर जनगणनेसाठी नियुक्ती केलेल्या शिक्षकांना शिकवणीसह जनगणनेचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र शासन नेहमीच मुलांच्या भविष्याशी खेळण्याचे काम करत आले आहे. शिक्षकांना इतर कामात गुंतवून ठेवून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा आणणे हे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन आहे. शिक्षकांना सरकारी कामात गुंतवून ठेवल्यामुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दत्तक घेतलेल्या शाळांची अवस्थाही चांगली नाही आहे.

- Advertisment -