एका रात्रीत गुप्त झाले गावातील लोक; काय आहे या शापित गावाचं रहस्य?

भारत एक असा देश आहे , ज्यात अनेक रहस्य आणि आकर्षणे आहेत. भारतातील मंदिरं, किल्ले, देवी-देवता यांच्यासोबतच काही रहस्यमय ठिकाणांबाबत देखील अनेक कथा आणि रहस्य प्रचलित आहेत. भारतातील अनेक रहस्यमय ठिकाणांपैकी असलेले राजस्थानातील कुलधरा हे ठिकाण केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. हे ठिकाण राजस्थानमधील जैसलमेरपासून 14 किमी अंतरावर आहे. असे मानले जाते की, हे गाव 1300 साली पालीवाल ब्राह्मण समाजाने सरस्वती नदीच्या काठी वसवलेले होते. एकेकाळी या गावात मोठी लोकसंख्या होती. मात्र आता या गावात कोणी फिरकत सुद्धा नाही. 200 वर्षांपासून हे गाव ओसाड पडलं आहे.

कुलधरा गाव पूर्णपणे ब्राह्मणांनी वस्ती होती. जे पाली प्रदेशातून जैसलमेरमध्ये स्थलांतरित होऊन कुलधारा गावात स्थायिक झाले होते. असं म्हणतात की, येथे आल्यानंतर या गावातील एका ब्राह्मणाने सर्वात आधी या जागेवर आपलं घर बांधले आणि एक तलाव देखील खोदला, ज्याचे नाव त्याने उधनसर ठेवलं होत.

एका रात्रीत गुप्त झाले गावातील लोक

अजब-गजब:आखिर क्या है राजस्थान के इस कुलधरा गांव का रहस्य? जो पिछले कई सालों  से हो रखा है शापित - What Is The Secret Of Kuldhara Village Of Rajasthan  Who Has Been

1800 च्या दशकात, हे गाव एक जहागीर सलीम सिंगच्या नेतृत्वाखाली होते, जे कर गोळा करायचा आणि लोकांचा विश्वासघात करायचा. गावकऱ्यांवर लादलेल्या करामुळे येथील लोक खूप नाराज होते. असे म्हटले जाते की, सलीम सिंगला या गावातील एक मुलगी आवडली त्यावेळी त्याने गावकऱ्यांना धमकी दिली की, जर त्या मुलीसाठी त्याला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तो अधिक कर वसूल करेल. आपल्या गावकऱ्यांचा जीव आणि गावातील त्या मुलीची इज्जत वाचवण्यासाठी संपूर्ण गाव रातोरात पळून गेले. गावकरी गाव ओसाड सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले. मात्र, तिथून निघताना गावकऱ्यांनी गावाला शाप दिला होता की, येत्या काळात इथे कोणीही राहू शकणार नाही.

सध्या या गावाला एक ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. अनेकजण पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देतात. मात्र, संध्याकाळनंतर या गावात कोणीही फिरकत नाही.


हेही वाचा :

भारतातील ‘या’ ठिकाणी आजही दररोज सूर्योदयानंतर येतात श्री राम!