उत्तर प्रदेश : यूपीच्या उन्नाव जिल्ह्यात एक अल्पवयीन मुलगी आणि विवाहित महिला ज्यांच्यात मेहुणी आणि वहिनीचे नाते आहे, त्या दोघांमध्ये प्रेमाचे प्रकरण समोर येत आहे. अल्पवयीन मुलीला विवाहित महिलेशी लग्न करायचे आहे. मात्र महिलेच्या कुटुंबीयांना हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी विवाहित महिलेवर अत्याचार करून तिला विष पाजल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केला आहे. मात्र पीडित कुटुंबाकडून तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अल्पवयीन तरुणीचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. संबंधित घटना बांगरमाऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. (In Unnao district of UP a minor girl is in love with her sister-in-law but her family opposes their marriage)
मिळालेल्या माहितीनुसार, बेहता मुजावर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीची तिच्या गावात राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी मैत्री आहे. या दोघांमध्ये मेहुणी आणि वहिनीचे नाते असून त्या दोघांना लग्न करायचे आहे. यासाठी अल्पवयीन तरुणी विवाहित महिलेच्या घरी गेली आहे. मात्र त्या दोघांच्या लग्नात विवाहित महिलेचे कुटुंबीय अडसर ठरत आहे. अशातच अल्पवयीन तरुणीने आरोप केला की, बांगरमाऊ येथे राहणाऱ्या महिलेचे तिच्या गावात सासर आहे. विवाहित महिलेसोबत माझी पाच महिन्यांपासून मैत्री आहे आणि आम्हा दोघांना लग्न करायचे आहे. मात्र विवाहित तरुणीचे कुटुंबीय आमच्या संबंधावर नाराज आहेत, असे तरुणीने म्हटले आहे.
हेही वाचा – Crime : बंगळुरूमध्ये आणखी एका आयटी अभियंत्याचा मृत्यू; आत्महत्या करण्यापूर्वी पती-पत्नीने मुलांना दिले विष
अल्पवयीन तरुणीने आरोप केला की, विवाहित महिलेला भेटण्यासाठी मी तिच्या घरी गेले होते. तेव्हा महिलेच्या कुटुंबीयांनी तिला पकडले आणि जबरदस्तीने विष पाजत मारहाण केली. विवाहितेला तिच्या माहेरच्या लोकांकडूनही मारहाण केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी विवाहितेला तिच्या वडिलांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. वडिलांचे म्हणणे आहे की, आमच्या मुलीने विष घेतल्याची माहिती मिळताच आम्ही याठिकाणी आलो आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच उपचारानंतर आम्ही आमच्या मुलीला माहेरी घेऊन जात आहोत. असे असले तरी सध्या मेव्हणी आणि वहिनीच्या प्रेमप्रकरणाची चर्चा लोकांमध्ये होताना दिसत आहे.
अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यास कारवाई
दरम्यान, या प्रकरणी सीओ बांगरमाऊचे पोलीस अरविंद चौरसिया यांनी सांगितले की, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. परंतु तक्रार करणारी तरुणी अल्पवयीन आहे. त्यामुळे तिने विष दिल्याचा आरोप दिला असला तरी आम्ही कारवाई करू शकत नाही. अल्पवयीन तरुणीच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.
हेही वाचा – Mukesh Chandrakar : क्रूरतेचा कळस; ठार मारण्यापूर्वी मुकेश चंद्राकारचे केले हाल; शवविच्छेदन अहवाल काय सांगतो