घरताज्या घडामोडीउत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 39 प्रवाशी जखमी, तर 8 जणांची प्रकृती चिंताजनक

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 39 प्रवाशी जखमी, तर 8 जणांची प्रकृती चिंताजनक

Subscribe

उत्तराखंडमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली. मसूरी डेहराडून रोडवरील आयटीबीपीच्या जवळ राज्य परिवहनाची एक बस दरीत कोसळली. या बसमध्ये एकूण 39 प्रवासी प्रवास करत होते. त्यातील 31 जणांना किरकोळ मार लागला आहे. तर 8 प्रवासी गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण अपघाताची माहिती मिळताच डेहराडूनच्या डीएम सोनिया सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेतली.

उत्तराखंडमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. अपघात झाल्यानंतर प्रचंड पाऊस सुरू होता. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडचणी येत आहेत. मसूरी-डेहराडून रोडवर आयटीबीपी जवळ ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सागितलं. बस अतिवेगाने येत असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट दरीत कोसळली. हा अपघात झाल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.

- Advertisement -

आयटीबापीचे जवान, पोलीस आणि फायर ब्रिगेडचे जवान रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत. या अपघातात जखमी झालेल्या 10 लोकांना आयटीबीपीच्या टीमने आयटीबीपीच्या रुग्णालयात दाखल केले. तर इतर जखमींना रुग्णवाहिकेतून मसूरी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, काही प्रत्यक्षदर्शींच्या मते चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस या संपूर्ण घटनेची पुढील तपासणी करत आहेत.


हेही वाचा : नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी घातला बहिष्कार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -