Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी धक्कादायक! तेलंगणात भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू

धक्कादायक! तेलंगणात भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू

Subscribe

एका 8 वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना तेलंगणातील वारंगलमध्ये घडली आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. छोटू असे या मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी काझीपेठ रेल्वे स्थानक परिसरात घडल्याचे समजते.

एका 8 वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना तेलंगणातील वारंगलमध्ये घडली आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. छोटू असे या मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी काझीपेठ रेल्वे स्थानक परिसरात घडल्याचे समजते. (in warangal stray dogs removed flesh from the body of an 8 year old boy mauled him to death)

नेमके काय घडलं?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, 8 वर्षीय मुलाचे आई-वडिल उदरनिर्वाहाच्या शोधासाठी उत्तर प्रदेशातून तेलंगणामध्ये आले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या मुलगाही होता. शुक्रवारी सकाळी काझीपेठ रेल्वे स्थानकावर शौचालयासाठी त्यांचा मुलागा गेला होता. त्यावेळी त्या परिसरात असलेल्या भटक्या कुत्र्यांनी त्याच्या हल्ला केला. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेनंतर शहरातील कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेत त्यांची नसबंदी करण्यात येत असल्याची माहिती मिळते. गेल्या फेब्रुवारीमध्ये तेलंगणामध्ये एका चार वर्षाच्या मुलाला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या एका वेदनादायक घटनेने संपूर्ण तेलंगणात हाहाकार माजवला होता.

- Advertisement -

हैदराबादमध्ये 5 वर्षीय मुलावर कुत्र्यांचा हल्ला

याशिवाय, अंबरपेट येथील परिसरात मृत मुलगा प्रदीपचे वडील सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रदीप हा वडिलांसोबत त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेला होता. त्यावेळी या अंबरपेट या परिसरात प्रदीप एकटा फिरत होता. प्रदीप एकटा असल्याचे पाहताच तेथील भटक्या तीन ते चार कुत्र्यांनी प्रदीपला घेरले. त्यानंतर प्रदीपने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रदीपचा मृत्यू झाला.

कुत्र्यांनी प्रदीपवर हल्ला केला त्यावेळी तेथे असलेल्या त्याच्या वडिलांना कुत्र्यांच्या तावडीतून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. अखेर या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी शेअर करत त्या व्हिडीओवर दु:ख व्यक्त केले.


हेही वाचा – फडणवीसांवर कुरघोडी करता-करता राऊतच झाले ट्रोल; वाचा नेमकं काय घडलं?

- Advertisment -