घरताज्या घडामोडीयुनेस्को जागतिक वारसा म्हणून तेलंगणामधील काकतीय रुद्रेश्वर मंदिराचा समावेश

युनेस्को जागतिक वारसा म्हणून तेलंगणामधील काकतीय रुद्रेश्वर मंदिराचा समावेश

Subscribe

या मंदिराला एक दोन नाही तर तब्बल एक हजार खांब आहेत. हे खांब या मंदिराचे खास आकर्षण आहे. हे मंदिर १३ व्या शतकातील अभियांत्रिकी चमत्कार मानला जातो.

तेलंगणामधील काकतीय रुद्रेश्वर मंदिराचा (Kakatiya Rudreshwar Temple ) ( रामप्पा मंदिर ramappa temple) युनेस्को जागतिक वारसा म्हणून समावेश झाला आहे. याची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे दिली. ट्विट करत मोदींनी संपूर्ण देशवासियांना मनापासून शुभेच्छा दिल्या. त्यांनी तेलगंणाच्या नागरिकांचे विशेष कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी काकतीय रुद्रेश्वराच्या मंदिराला अधिकाधिक लोकांनी भेट द्यावी, असे आवाहन देखील केले. तेलंगणामधील काकतीय रुद्रेश्वराच्या मंदिराल रामप्पा मंदिर असेही म्हटले जाते. (ramappa temple)  मूर्तिपूजक रामप्पा यांचे ते नाव आहे. या मंदिराची भव्यता पर्यटकांना प्रेमात पाडते. अशा सुंदर वास्तुचे नाव आज युनेस्कोत जागतिक वारसा स्थळ म्हणून कोरण्यात आले आहे. याची माहिती युनेस्कोच्या अधिकृत ट्विटवरून देखील देण्यात आली. (Inclusion of Kakatiya Rudreshwar Temple ramappa temple in Telangana as a UNESCO World Heritage Site, PM Modi congratulated countrymen)

- Advertisement -

 

रामप्पा मंदिर हे एकमेव असे मंदिर आहे ज्याचे नाव वास्तुविशारद रामाप्पा यांच्या नावाने ठेवण्यात आले आहे. इतिहासानुसार, काकतीय राजवंशाच्या राजाने १३ व्या शतकात हे मंदिर बांधले आहे. एतक्या वर्षांत अनेक मंदिरे खचून तुटून गेली मात्र रामप्पा मंदिर चांगल्या स्थितीत आहे. आजवर अनेक आपत्ती येऊन गेल्या मात्र रामप्पा मंदिराचे विशेष कोणतेही नुकसान झालेले नाही. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला एक दोन नाही तर तब्बल एक हजार खांब आहेत. हे खांब या मंदिराचे खास आकर्षण आहे. हे मंदिर १३ व्या शतकातील अभियांत्रिकी चमत्कार मानला जातो. २०१९मध्ये या मंदिराला जागतिक वारसा मिळावा यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि २०२१ ला हा प्रस्ताव मंजूर होऊन रामाप्पा मंदिर जागतिक वारसा म्हणून ओळखले जाणार आहे.

- Advertisement -

 

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी देखील ट्विटकरत या प्रसंगी सर्वांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. ‘युनेस्कोने रामप्पा मंदिरला जागतिक वारसा म्हणून घोषित केल्याने मला फार आनंद होत आहे. पंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन आणि पाठिंब्यासाठी मी देशाच्या आणि विशेषत: तेलंगणाच्या जनतेच्यावतीने आभार मानतो, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा – हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात दरड कोसळून ९ जणांचा मृत्यू, ३ जण जखमी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -