घरताज्या घडामोडीबागेश्वर बाबांचं उत्पन्न ऐकून तुम्हीही व्हाल थक्क, खुद्द शास्त्रींनीच दिली माहिती

बागेश्वर बाबांचं उत्पन्न ऐकून तुम्हीही व्हाल थक्क, खुद्द शास्त्रींनीच दिली माहिती

Subscribe

मागील काही दिवसांपासून छतरपूर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत. सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या बागेश्वर बाबांचं उत्पन्न किती आहे. हा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यामुळे बागेश्वर बाबा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी बागेश्वर बाबा म्हणाले की, माझी काही फिक्स इन्कम नाही. जितके सनातनी लोक आहेत तीच माझी कमाई. आता त्याचा हिशेब तुम्ही स्वत:च करा, असं बाबा म्हणाले.

लोकांना हवे तेवढे दान, घर, फ्लॅट, घोडे, वाहन, एफडी, सोने-चांदी देण्यास सांगतात का? त्यावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, आमचा डिस्क्लेमर यातच आहे. आम्ही माईक वाजवून सांगतो की, येथे कोणत्याही प्रकारची फी किंवा दक्षिणा नाही. पण जर तुम्ही स्वतःला शिष्य मानत असाल तर गुरूच्या परंपरेनुसार तुम्हाला जे काही द्यायचे आहे ते द्या.

- Advertisement -

आमची कुठलीही कंपनी अथवा व्यवसाय नाही. भक्त जी दक्षिणा देऊन जातात तेच पैसे बागेश्वर धामकडे असतात. खरंतर आमच्याकडे कोट्यवधी सनातनी लोकांचं प्रेम आहे. कोट्यवधी लोकांचा आशीर्वाद आहे. इतकीच आमची कमाई आहे. जितके सनातनी तितकी आमची कमाई, असं बागेश्वर बाबा म्हणाले.

आपल्या बालपणीच्या संघर्षाबाबत सांगताना शास्त्री म्हणाले की, आपले जीवन अतिशय गरिबीत गेले आहे. वडील, आई, मी, धाकटा भाऊ आणि बहीण असे पाचही जण एका छोट्याशा झोपडीत त्यावेळी राहायचो. त्यात देवालाही स्थान होते. दादा गुरुजी हे निर्मोही आखाड्याचे संत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाची फारशी पर्वा नव्हती. आमचे आयुष्य खूप विचित्र परिस्थितीतून गेले.

- Advertisement -

भक्त आणि शिष्यांकडून काही घेणं चुकीचं नाही. जे काही घेताय त्याचा सदुपयोग की दुरुपयोग होतोय ते महत्त्वाचं आहे. जर कोणी काही देत असेल तर आम्ही त्याचा स्वीकार करतो. मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्री यांची दर महिन्याची कमाई जवळपास ३.५ लाख रुपये इतकी आहे. तर एका कथेसाठी ते ८ हजार रुपये घेतात. तसचे शास्त्री यांची नेटवर्थ ९ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.


हेही वाचा : महाराष्ट्राचे आतापर्यंत झालेले राज्यपाल एका क्लिकवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -