घरदेश-विदेशकरदात्यांना दिलासा! आयकर विभागाने ई-फाईलिंगची वाढवली मुदत; वाचा सविस्तर

करदात्यांना दिलासा! आयकर विभागाने ई-फाईलिंगची वाढवली मुदत; वाचा सविस्तर

Subscribe

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हणजेच CBDT प्राप्तिकर अधिनियम, १९६१ अंतर्गत विविध फॉर्म इलेक्ट्रॉनिक भरण्याच्या तारखा वाढवण्याची घोषणा केली आहे. करदात्यांना काही फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कलम १० किंवा कायद्याच्या ८० जी अंतर्गत नोंदणी किंवा माहितीसाठी अर्ज क्रमांक १० ए मधील अर्ज ३० जून २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करणे आवश्यक आहे. ती २५ जून ते ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढवण्यात आली होती, आता ती ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी दाखल केली जाऊ शकते. कलम १०, १२ ए किंवा ८० जी अंतर्गत फॉर्म १० एबीमध्ये नोंदणीसाठी अर्ज, पूर्वीची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२२ होती, आता ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी दाखल केली जाऊ शकते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी फॉर्म १ मधील इक्वलायझेशन लेव्ही स्टेटमेंट, ज्याची तारीख ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढवण्यात आली असून ही तारीख आता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत दाखल केले जाऊ शकते. ३० जून २०२१ रोजी संपलेल्या तीन महिन्यात फॉर्म 15G/15H मध्ये प्राप्तकर्त्यांकडून प्राप्त झालेल्या घोषणा अपलोड करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२१ होती, जी तारिख ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत दाखल केली जाऊ शकते.

असा भरा इन्कम टॅक्स रिटर्न

ऑनलाईन प्राप्ती कर विवरण भरण्यासाठी तुम्हाला आधी https://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर रजिस्टर करावं लागतं. ही आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट आहे. एकदा तुम्ही यावर रजिस्टर झालात की तुमचे विवरण अगदी सहज घरबसल्या भरू शकता. या वेबसाईटवर तुम्हाला तुम्ही यापूर्वी भरलेली विवरण पत्रं, तुमचा उद्गम कर आणि आयकर खात्यासंबंधित सर्व व्यवहारांची माहिती मिळू शकते.


Kabul Airport Attack: काबूल विमानतळाजवळ आज पुन्हा एअरस्ट्राइक

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -