घरदेश-विदेशपैसा कळवा, पैसा मिळवा; आयकर विभागाचा नवा फंडा

पैसा कळवा, पैसा मिळवा; आयकर विभागाचा नवा फंडा

Subscribe

आयकर विभागाचे ऑब्झर्व्हर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात नेमण्यात आले असून, निवडणुकीच्या काळात होणाऱ्या खर्चावर नजर ठेवण्याचे काम या टीमकडून होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत अवैध पैशांच्या, वस्तुंच्या वापराबाबत माहिती देणार्‍यांना आयकर अन्वेषण विभागामार्फत बक्षीस मिळणार आहे. माहिती देणार्‍यांना कोणताही वैयक्तिक तपशील विचारला जाणार नाही. टोल फ्री क्रमांकावर माहिती कळवून नागरिकांना लोकसभा निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी योगदान देता येईल अशी माहिती आयकर अन्वेषण विभागाचे महासंचालक के. के. व्यवहारे यांनी दिली. निवडणुकीदरम्यान देण्यात आलेली कोणत्याही अप प्रकाराबाबतची माहिती विभागाच्या कंट्रोल रूममार्फत गुप्त ठेवण्यात येईल, असे स्पष्टीकरण त्यांनी पत्रकार परिषदेत दिले. १८००२२१५१० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

यंत्रणेचं असणार बारीक लक्षं

लोकसभा २०१४ निवडणूकीत कंट्रोल रूमकडे १२५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र, आयकर विभागाच्या मर्यादित यंत्रणेमुळे सगळ्या तक्रारींचा पाठपुरावा करणे विभागाला शक्य झाले नाही, अशीही कबुली त्यांनी दिली. मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघासाठी क्विक रिस्पॉन्स टीम नेमण्यात आली आहे. आमच्या यंत्रणेकडे माहिती उपलब्ध झाल्यावर एका तासाच्या आत तत्काळ त्या माहितीवर कारवाई करण्यात येईल. संपुर्ण निवडणूकीसाठी विभागाच्या  २०० जणांची टीम कार्यरत असणार आहे. निवडणूक आयोगासारखेच आमच्या विभागाचे ऑब्झर्व्हर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात नेमण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळात होणाऱ्या खर्चावर नजर ठेवण्याचे काम या टीमकडून होणार आहे. विमानतळाच्या ठिकाणी कारवाईसाठी एअर इंटेलिजन्स टीम काम करणार आहे. आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक एअरपोर्ट तसेच हेलिकॉप्टर फेर्‍य देखील या यंत्रणेकडून मॉनिटर केल्या जातील. सीआयएसएफ तसेच आरपीएफ यासारख्या सुरक्षा यंत्रणांसोबतही आयकर अन्वेषण विभागाकडून समन्वय साधला जात आहे.

- Advertisement -

निवडणुकांच्या आधीच काही ठिकाणी सहकारी संस्था व बँकांच्या पैसे हस्तांतरणशी संबंधी आतापर्यंत प्रकरणे समोर आली होती. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे ३५ कोटी रोख रक्कम आतापर्यंत जप्त करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तीन स्थरावर विभागाची यंत्रणा काम करणार आहे असे त्यांनी सांगितले. मागच्या निवडणुकीपेक्षा यंदा पुरेसे मनुष्यबळ विभागाकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे आहेत महत्वाचे क्रमांक

टोल फ्री क्रमांक १८००२२१५१०

- Advertisement -

दूरध्वनी क्रमांक २२८२०५६२

मोबाईल / वॉट्सअॅप 9372727823 / 9372727824

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -