Dolo-650 औषध बनवणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाची धाड; कर चुकवेगिरीमुळे कारवाई

जानेवारी 2020 पासून पॅरासिटामोलची विक्री पाहता, Dolo 650 विक्रीच्या बाबतीत अव्वल आहे. विक्रीच्या बाबतीत कल्पोल आणि सुमो एल दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Income Tax Department raids Dolo-650 manufacturer Micro Lab office in Bengaluru

भारतातील लोकप्रिय डोलो-650 हे औषध बनवणाऱ्या बंगळुरुमधील मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. आयकर विभागाच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांच्या पथकाने बंगळुरूस्थित रेसकोर्स रोडवर असलेल्या या औषध कंपनीच्या कार्यालयावर छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे.

मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या देभरातील 40 ठिकाणांच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या 200 अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकले. यात नवी दिल्ली, सिक्कीम, पंजाब, तामिळनाडू आणि गोव्यासह विविध ठिकाणांमधील कार्यालयांचा समावेश आहे. याशिवाय मायक्रो लॅबचे सीएमडी दिलीप सुरीना , संचालक आनंद सुराणा यांच्या घरांवरही आयकरने छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान बंगळुरूमधील माधवनगरमधील रेसकोर्स रोडवरील मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या कार्यालयातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

कोरोना महामारीदरम्यान कंपनीने भारतात विक्रमी कमाई केली, या काळात भारतात ताप, सर्दी, खोकला अंगदुखीसाठीच्या आजारांवर Dolo-650 चा वापर मोठ्याप्रमाणात वाढता. 2020 मध्ये कोरोना सुरु झाल्यापासून कंपनीने 350 कोटी टॅब्लेट विकत एका वर्षात 400 कोटी रुपयांचा महसूल कमावला. यावेळी डोलो- 650 गोळीने विक्रीने सर्व रेकॉर्ड मोडले.

मार्च 2020 पासून 567 कोटी रुपयांच्या डोलो 650 गोळीची विक्री झाली आहे. एवढेच नाही तर या गोळीला कोरोनाच्या काळात आवडता ‘स्नॅक’ म्हटले जात आहे. एका वर्षात त्याची इतकी विक्री झाली की , गेल्या वर्षी #Dolo650 सोशल मीडियावर मेम फेस्टमध्ये ट्रेंड करत होता.

जानेवारी 2020 पासून पॅरासिटामोलची विक्री पाहता, Dolo 650 विक्रीच्या बाबतीत अव्वल आहे. विक्रीच्या बाबतीत कल्पोल आणि सुमो एल दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतात पॅरासिटामोलचे 37 ब्रँड आहेत, ज्यांची विक्री देशातील विविध प्रदेशांमध्ये सर्वाधिक आहे. Dolo 650 ची निर्मिती बंगळुरू येथील मायक्रो लॅब्स लिमिटेडद्वारे केली जाते. डोलो 650 ची डिसेंबर 2021 मध्ये 28 कोटी रुपयांची विक्री कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झाली. एप्रिलमध्ये त्याच्या विक्रीने 48.9 कोटी कमावले तर मेमध्ये 44.2 कोटी रुपये कमावले. भारतात तापासाठी क्रोसिन नावाची लोकप्रिय गोळी वापरली जाते. मात्र कोरोनात डोलो नावाच्या या गोळीने क्रोसिनची जागा मिळवली आहे.


डीजीसीएची स्पाइसजेटला कारणे दाखवा नोटीस, विमानात १८ दिवसांत ८ वेळा बिघाड