घरताज्या घडामोडीIncome Tax Raid: चीनच्या Huawei कंपनीवर मोठी कारवाई, दिल्लीतील कार्यालयांवर आयकर विभागाची...

Income Tax Raid: चीनच्या Huawei कंपनीवर मोठी कारवाई, दिल्लीतील कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी

Subscribe

चीनची दुरसंचार कंपनी Huawei वर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. दिल्ली, गुरूग्राम (हरियाणा) आणि बंगळुरू येथील जागेंवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. भारतीय व्यवसाय आणि परदेशी व्यवहारांविरूद्ध आर्थिक कागदपत्रे पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही रेकॉर्डही जप्त करण्यात आले आहेत.

देशात त्यांची कंपनी कायद्यानुसार काम करत आहे. आयकर विभागाने आमच्या कार्यालयात जाऊन काही कर्मचाऱ्यांची चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे, असं कंपनीने म्हटलंय.

- Advertisement -

Huawei कंपनी मोठ्या प्रमाणात विश्वास आहे की, आमची कंपनी भारतातील सर्व प्रकारचे कायदे आणि नियमांचं पालन करतात. अधिक तपशीलांसाठी आम्ही संबंधित सरकारी विभागांशी संपर्क साधू आणि नियमांनुसार पूर्ण सहकार्य करू आणि योग्य प्रक्रियेचे पालन करू,असं कंपनीने म्हटलंय. तसेच सरकारने Huawei ला ५जी सेवांच्या चाचणीपासून दूर ठेवल्याचंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, मागील वर्षात आयकर विभागाने चिनी मोबाईल कंपन्या Xiaomi आणि Oppo आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांवर छापे टाकण्यात आले होते. या छाप्यांमध्ये ६ हजार ५०० कोटींची चोरी पकडल्याचा दावा आयकरने विभागाने केलाय. चिनी कंपन्यांनी कर, कायदे आणि नियमांचे उल्लंघन करून चोरी करण्याचे आरोप करण्यात आले होते. दरम्यान, ५४ अॅपवर बंदी घालण्यात आली होती. यामध्ये अनेक गेम, व्हिडिओ आणि वीवा व्हिडिओ एडिटरचा सहभाग आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IPL Mega Auction 2022 : आयपीएलमध्ये १०.७५ कोटींचा पाऊस पडल्यानंतर निकोलस पूरनने दिली पिझ्झा पार्टी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -