घरदेश-विदेशआयकर विभागाने करदात्यांना पाठवले ८४,७८१ कोटी, तुमच्या खात्यात जमा झाले का पैसे?

आयकर विभागाने करदात्यांना पाठवले ८४,७८१ कोटी, तुमच्या खात्यात जमा झाले का पैसे?

Subscribe

आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात ११ ऑक्टोबरपर्यंत ५९.५१ लाखाहून अधिक करदात्यांच्या खात्यात ८४,७८१ कोटी रुपयांहून अधिक परताव्याची रक्कम जमा केली आहे. १ एप्रिल २०२१ ते ११ ऑक्टोबर २०२१ दरम्यनाचा हा परताव्याचा आकडा आहे. यातील वैयक्तिक आयकर परताव्याची रक्कम २२,२१४ कोटी रुपये होती तर कॉर्पोरेट्स परताव्याची रक्कम ६२,५६७ कोटी रुपये आहे.

आयकर विभागाने ट्विट करत माहिती दिली की, सीबीडीटीने १ एप्रिल २०२१ ते ११ ऑक्टोबर २०२१ दरम्यान ५९.५१ लाखांहून अधिक करदात्यांची ८४, ७८१ कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत दिली आहे. यात ५७,८३,०३२ प्रकरणांमध्ये २२,२१४ कोटी रुपयांचा आयकर परतावा जारी करण्यात आला आणि १,६७,७१८ प्रकरणांमध्ये ६२,५६७ कोटी रुपयांचा कॉर्पोरेट करत परतावा जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात २०२०-२१ मध्ये आयकर विभागाने २.३८ कोटी करदात्यांना २.६२ लाख कोटी रुपयांचे कर परतावे जारी केले होते. आर्थिक वर्ष २०१९ -२० मध्ये जारी १.८३ लाख कोटी रुपयांच्या परताव्यापेक्षा हे ४३.२ टक्के अधिक आहे.

- Advertisement -

आयकर रिटर्न दाखल करताना (Income Tax return) नव्या पोर्टलवर करदात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे वेबसाईट तयार करणारे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सलिल पारेख यांना मोठ्याप्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. यानंतर सलिल पारेख यांनी बुधवारी कंपनीद्वारे विकसित नव्या पोर्टलवर सुधारणा होत असून आत्तापर्यंत १.९ कोटी रिटर्न फाईल करण्यात आल्याचे सांगत करदात्यांच्या अडचणी लवकरचं दूर होतील असे आश्वासन दिले आहे. पारेख यांनी सांगितले की, आत्तापर्यंत ३.८ कोटी वापरकर्त्यांनी विभिन्न देवाण-घेवाण पूर्ण केली आहे. यात दरदिवसा २ ते ३ लाख आयटी रिटर्न फाईल होत आहेत.



 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -