Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत डेडलाईन संपली तरी भरता येणार प्राप्तिकर; त्यासाठी या स्टेप्स कराव्या लागतील फॉलो

डेडलाईन संपली तरी भरता येणार प्राप्तिकर; त्यासाठी या स्टेप्स कराव्या लागतील फॉलो

Subscribe

आयकर (Income Tax) रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. मात्र, अनेकांना या तारखेपर्यंत प्राप्तिकर (आयकर रिटर्न) भरता आला नसेल

नवी दिल्ली : आयकर (Income Tax) रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. मात्र, अनेकांना या तारखेपर्यंत प्राप्तिकर (आयकर रिटर्न) भरता आला नसेल. मात्र, आता चिंता करण्याची गरज नसून, तुम्हाला काही स्टेप्स आहेत त्या फॉलो कराव्या लागणार असून, काही दंडसुद्धा भरावा लागणार आहे.

एवढा भरावा लागणार दंड

ज्या करदात्यांनी 31 जुलैपर्यंत प्राप्तिकर भरला नाही. त्यांना आता 31 डिसेंबरपर्यंत प्राप्तिकर भरता येणार आहे. यामध्ये नोकरदार करदाते की, ज्यांचे वार्षिक करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्यांना पाच हजार रुपये तर पाच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक करपात्र उत्पन्न असलेल्या करदात्यांना 1 हजार रुपये दंड भरून प्राप्तिकर दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

साडेसहा कोटीहून अधिक जणांनी भरला प्राप्तिकर

- Advertisement -

प्राप्तीकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 31 जुलैपर्यंत देशातील तब्बल 6.50 कोटीहून अधिक करदात्यांनी प्राप्तिकर भरला असून, तर सोमवारी शेवटच्या दिवशी आयकर भरण्यात कोणतीही अडचण आली नसल्याची माहिती प्राप्तीकर विभागाने दिली आहे.

हेही वाचा : शहबाज शरिफांना सुचले शहाणपण; म्हणाले,’युद्ध हा पर्याय नाही’

एकाच दिवशी 37 लाख करदात्यानी भरला प्राप्तिकर

- Advertisement -

सोमवारी शेवटच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 37 लाख लोकांनी प्राप्तिकर भरण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचा परतावाही ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून जारी केला जाणार आहे.

हेही वाचा : Gurugram : हरियाणा हिंसाचाराचे लोण गुरुग्रामपर्यंत; जमावाने हॉटेल, दुकानं जाळली

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त

मुदतीत आयकर भरणाऱ्यांना ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून रिफंड मिळायाला सुरुवात होणार असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाने दिली आहे. मागील वर्षी 31 जुलैपर्यंत 5.83 कोटी एवढा प्राप्तिकर भरण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -