घरदेश-विदेशगुजरातच्या बड्या व्यावसायिकावर आयकराची छापेमारी; 20 कोटींची मालमत्ता जप्त

गुजरातच्या बड्या व्यावसायिकावर आयकराची छापेमारी; 20 कोटींची मालमत्ता जप्त

Subscribe

सीबीडीटीने मंगळवारी पत्रकारांना दिलेल्या निवेदनानुसार, आयकराने 20 जुलै रोजी ही छापेमारी केली आहे. या छापेमारीत कागदपत्रे, डिजिटल डेटाच्या स्वरुपातील विविध महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत

गुजरातमधील एका बड्या व्यावसायिकावर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाने गुजरातच्या प्रमुख व्यावसायिकाच्या खेडा, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद, कोलकत्तासह 58 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. या छाप्यात 1000 कोटींहून अधिकची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे. आयकराच्या कारवाईमुळे गुजरातमधील व्यावसायिकाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या निवेदनानुसार, या छाप्यात 20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, दागिने, सराफा आणि इतर मालमत्ता जप्त केली आहे. गुजरातमध्ये आयकराने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. ज्याची चर्चा देशभरात सुरु आहे.

सीबीडीटीने मंगळवारी पत्रकारांना दिलेल्या निवेदनानुसार, आयकराने 20 जुलै रोजी ही छापेमारी केली आहे. या छापेमारीत कागदपत्रे, डिजिटल डेटाच्या स्वरुपातील विविध महत्त्वाची कागदपत्रे सापडली असून ती जप्त करण्यात आली आहे. या कागदपत्रांवरून दिसून आले की, या उद्योगसमुहाकडून विविध पद्धतींचा वापर करून मोठ्याप्रमाणात करचोरी केली जात होती. यामध्ये बँक अकाऊंच्या बुकबाहेर रोख विक्री करणे, बनावट खरेदीचे बुकिंग आणि व्यवहारातून स्थावर मालमत्तेतून पैशांच्या पावत्या देणे आदीचा समावेश आहे.

- Advertisement -

कोलकत्तामधील शेल कंपन्यांकडून शेअर प्रीमियमच्या माध्यमातून बेहिशेबी व्यवहारांचे थर लावण्यात हा उद्योग समूह गुंतल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान ईडीने मंगळवारी म्हटले की, 3986 कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात चेन्नईस्थित सुराणा ग्रुपवर कारवाई करत 51 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 67 पवनचक्क्या जप्त केल्या आहेत.

यात अलीकडेच गुजरातमधील कापड, पॅकेजिंग आणि शिक्षण क्षेत्रातील चिरीपाल समूहाच्या मालमत्तेवर आयकराने छापेमारी केली. या छापेमारीत 25 कोटी रुपयांची रोख आणि दागिने जप्त केले आहेत. तर या उद्योग समुहाशी निगडीत व्यक्तीच्या बंगल्याच्या तपासणीत बेडरुमच्या कपाटातून 16 कोटी रुपये रोख जप्त केले, यात 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांचा बंडल होता. याशिवाय इतर ठिकाणांहून 9 कोटी रुपये जप्त केले आहेत.


हेही वाचा : येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार : अविनाश भोसले, संजय छाब्रियाच्या ४१५ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -