घरताज्या घडामोडीHero Motocorpवरील आयकर विभागाच्या धाडीत १ हजार कोटींचा घोटाळा उघड, शेअर्समध्ये १०...

Hero Motocorpवरील आयकर विभागाच्या धाडीत १ हजार कोटींचा घोटाळा उघड, शेअर्समध्ये १० टक्क्यांची घसरण

Subscribe

हिरो मोटोकॉर्पवर आयकर विभागाने धाड टाकली असून १ हजार कोटींचा घोटाळा उघडकीस आलाय. तसेच त्याचा परिणामही शेअर्सवर झाला असून शेअर्समध्ये १० टक्क्यांची घसरण झाली आहे. हा संपूर्ण खर्च कंपनीच्या अकाऊंटमध्ये दाखवण्यात आला होता. परंतु वास्तविक म्हणजे हा संपूर्ण खर्च कंपनीने केलाच नव्हता. मात्र, या धाडीमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास दहा टक्क्यांची घसरण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने २३ मार्च ते २६ मार्च दरम्यान Hero MotoCorp च्या कंपनी आणि परिसरावर छापे टाकले. कंपनीने १ हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा दावा केल्याच निदर्शनास आढळून आलं होतं. परंतु प्रत्यक्षात हा खर्च कंपनीने केलाच नसल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

तपासात मिळाली संशयास्पद माहिती

आयकर विभागाच्या छाप्यात हार्ड कॉपी आणि डिजिटल डेटामध्ये संशयास्पद माहिती सापडली आहे. आतापर्यंत Hero MotoCorp ने या वृत्तावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाहीये.

शेअर्समध्ये १० टक्क्यांनी घसरण

Hero MotoCorp च्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. हिरो मोटोकॉर्पचे शेअर्स मंगळवारी जवळपास ७ टक्क्यांनी घसरून २२१९ रुपयांवर बंद झाले. हिरो मोटोकॉर्पच्या शेअर्सवर या वर्षाच्या सुरुवातीपासूनच दबाव आहे. यावर्षी कंपनीचा शेअर्स दहा टक्क्यांनी घसरला आहे.

- Advertisement -

एकूण ४० ठिकाणी छापे

आयकर विभागाची छापेमारी चार दिवस सुरू होती. यादरम्यान हिरो मोटोकॉर्पच्या अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पवन मुंजाल यांच्या दिल्ली-एनसीआरमधील निवासस्थानाचीही तपासणी करण्यात आली. हिरो मोटोकॉर्पशी संबंधित एकूण ४० ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. आयकर विभागाला छतरपूर, दिल्ली येथे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहारासह फार्म हाऊस देखील खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात १०३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर मृत्यूचा आकडा शून्यावर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -