घरदेश-विदेशजालन्यातील बडे स्टील व्यावसायिक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर ; 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

जालन्यातील बडे स्टील व्यावसायिक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर ; 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

Subscribe

तर यापूर्वी पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने माजी कॅबिनेट मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे निलंबित नेते पार्थ चॅटर्जी यांना अटक केली

जालना : देशातील विविध राज्यांमध्ये आर्थिक गैव्यहार प्रकरणांविरोधात ईडीसह आयटी आणि इतर तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. ज्यात राजकीय, चित्रपट सृष्टीनंतर बड्या व्यावसायिकांवर तपास यंत्रणांचे धाडसत्र सुरु आहे. यात जालन्यातही गज उत्पादन कारखानदारांच्या घरावर आज आयकर विभागाने धाड टाकली आहे. या छापेमारीत आयकराने 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. यात 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरेसह 16 कोटींचा ऐवज आयकराने जप्त केला आहे. याशिवाय 300 कोटींची मालमत्तेसंबंधीत कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे. जालन्यातील आयकराच्या धाडसत्राने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जालन्यात 1 ऑगस्टपासून हे धाड सत्र सुरु होते, गेल्या 8 दिवसांपासून हे धाडसत्र सुरु होते. आयकराच्या अधिकाऱ्यांनी विविध पथकांच्या मदतीने एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी मारली. आयकर विभागाकडून जालन्यातील नवीन एमआयडीसी मधील 3 रोलिंग मिल आणि त्यासंबंधीत आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरु आहे. यात औरंगाबादच्या एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. या कारवाईत तब्बल 390 कोटींची रोकड जप्त केली. अधिकाऱ्यांनी ही रोकड मोजण्यासाठी तब्बल 16 तास लागले.

- Advertisement -

हेही वाचा : आयटीच्या रडारवर चित्रपटसृष्टी, ४० ठिकाणी छापेमारी, २०० कोटींहून अधिक बेहिशोबी रोकड जप्त

विशेष म्हणजे जालन्यात आयकर विभागाचे अधिकारी कोणालाही खबर लागू नये यासाठी मॅरेज पार्टीचे स्टिकर्स लावलेल्या लग्नाच्या गाड्यातून शहरात पोहोचले. मात्र जालन्यातील चार बड्या स्टील कारखानदारांनी आर्थिक व्यवहारातून कोट्यावधी रुपयांचे अधिक उत्पन्न आणि व्यवहार रोखीत केले, याची माहिती रेकॉर्डवर आलेली नाही. त्यामुळे आयकर विभागाने अतिशय गुप्तपणे ही छापेमारी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘जप्त केलेल्या पैशांशी माझा संबंध नाही, माझ्याविरोधात कट रचला’; ‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी पार्थ चॅटर्जींचा खुलासा

गेल्या काही महिन्यांपासून राजकीय नेते आणि चित्रपटसृष्टीतील प्रमुख व्यक्ती तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. यात 2 ऑगस्टला चित्रपट निर्माते, वितरक आणि वित्त पुरवठादारांसंबंधीत 40 ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकली. यात कोट्यावधींची मालमत्ता जप्त करण्यात आली. या कारवाईत दाक्षिणात्य चित्रपट चैन्नई, मदुराई, कोईम्बतूर आणि वैल्लूरमधून 200 कोटीहून अधिकची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

तर यापूर्वी पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने माजी कॅबिनेट मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे निलंबित नेते पार्थ चॅटर्जी यांना अटक केली. याप्रकरणी ईडीने चटर्जी यांच्यासह अन्य 12 जणांच्या घरांवर छापेमारी केली. यातील एका छाप्यात चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून 20 कोटी रुपयांच्या नोटा व अन्य मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच, अर्पिता यांच्या दुसऱ्या घरातूनही 27 कोटी 90 लाख रुपये व 6 किलो सोने सापडले. त्यामुळे तपास यंत्रणा आता देशभरात सक्रिय होत विविध ठिकाणी छापेमारी करत आहेत.


जगदीप धनखड आज देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून घेणार शपथ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -