घरताज्या घडामोडीकरदात्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा! कोरोनाकाळात मोठा दिलासा!

करदात्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा! कोरोनाकाळात मोठा दिलासा!

Subscribe

कोरोनाचं थैमान आणि त्यामुळे समोर उभं राहिलेलं प्रचंड मोठं आर्थिक संकट या कचाट्यात सामान्य माणूस अडकलेला असताना केंद्र सरकारने त्या सामान्य माणसाला मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे ऐन कोरोनाच्या धुमश्चक्रीत सामान्य माणसासाठी ही एक मोठी घोषणा ठरली आहे. जे भारतीय कर भरतात, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आता आयकर अर्थात इन्कम टॅक्स भरण्याची मुदत सरकारने वाढवली आहे. याआधी मे महिन्यात कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ही मुदत वाढवण्यात आली होती. ती ३१ मार्चवरून ३१ जुलैपर्यंत करण्यात आली होती. त्यामध्ये सरकारने आता पुन्हा वाढ केली आहे. २०१९-२०चा आयकर परतावा भरण्याची मुदत आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यासोबतच, ऑडिट करण्याची आवश्यकता असलेल्या करदात्यांसाठी ही मुदत ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य करदात्यांसाठी ही खूशखबरच म्हणावी लागेल.

- Advertisement -

कोरोनाच्या काळात जसं देशातल्या विविध सरकारांसमोर आणि केंद्र सरकारसमोर देखील मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे, तसंच ते देशातल्या सर्वसामान्य नागरिकांसमोर देखील उभं राहिलं आहे. विशेषत: करदात्यांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. एकीकडे लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद होतं. पगार कपात किंवा बेरोजगारीचा फटका बसला होता. मात्र, दुसरीकडे आयकर भरणं चुकवता येणार नसल्यामुळे हा पैसा आणायचा कुठून? अशा विवंचनेत सामान्य करदाता असताना केंद्र सरकारने सामान्य भारतीयांची हीच अडचण ओळखून आयकर आणि कर परतावा भरण्याची मुदत वाढवली आहे. मात्र, या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर देखील काही काळ ताण येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -