घरदेश-विदेशITR भरणाऱ्यांना यंदा मिळणार 2.5 लाखांपर्यंत अतिरिक्त सूट; 5 लाखांनंतर सुरू होणार...

ITR भरणाऱ्यांना यंदा मिळणार 2.5 लाखांपर्यंत अतिरिक्त सूट; 5 लाखांनंतर सुरू होणार टॅक्स कॅल्क्युलेशन

Subscribe

देशात इनकम टॅक्स भरण्याची प्रक्रिया 15 जुलैपासून सुरु झाली आहे. त्यामुळे तुम्ही देखील अद्याप टॅक्स भरला नसेल तर लवकर भरून घ्या. कारण यंदा केंद्र सरकारने इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची डेडलाईन वाढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे टॅक्स भरण्यासाठी अवघे काही दिवसचं उरले आहेत. त्यामुळे डेडलाईननंतर आयटीआर फाइल करणाऱ्यांना दंड भरावा लागेल. मात्र यंदा काही लोकांना आयटीआर भरण्यासाठी 2.5 लाख रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. जाऊन घेऊन यंदाची प्रक्रिया कशी आहे.

टॅक्स स्लॅब होणार 2.5 लाखांपासून सुरू

सामान्यतः 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास ते टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतात. म्हणजेच जर त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना टॅक्स भरावा लागतो. साधारणत: 2.5 लाख ते 5 लाख रुपयांवर वार्षिक 5 टक्के टॅक्स कापला जातो.

- Advertisement -

अतिरिक्त सूट कोणाला आणि कशी मिळेल?

दरम्यान अतिरिक्त सूट कोणाला मिळेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. आम्ही सांगतो की, सिनियर सिटिजन ज्यांचे वय 60 ते 80 वर्षांच्या दरम्यान आहे त्यांना टॅक्स भरावा लागतो. परंतु 60 ते 80 वर्षांपर्यंत वय असलेल्या लोकांचे जर 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्यास त्यांना टॅक्स ब्रॅकेट सुरु होते. त्यानुसार या लोकांचे 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्यास त्यांना टॅक्स भरावा लागतो. याच लोकांना 50 हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे.

2.5 लाख रुपयांची अतिरिक्त सूट कशी मिळवायची?

याशिवाय काही लोकांना व्हेरी सिनियर सिटीझनच्या श्रेणीतही ठेवण्यात आले आहे. म्हणजेच ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांनाही टॅक्स भरण्यात अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. म्हणजेच अशा व्हेरी सिनियर सिटीझन लोकांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर ते टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतात. आता यानुसार या लोकांना सामान्य टॅक्सपेयरच्या तुलनेत 2.5 लाखांची अतिरिक्त सूट मिळते.


हेही वाचा : विदर्भ, मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; अजित पवारांचे सरकारला पत्र

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -